नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याला रेल्वेने नाशिक रोड, देवळाली, ओढा, खेरवाडी आणि कसबे-सुकेणे या पाच स्थानकांवर सुमारे तीन कोटी प्रवासी येतील, असे गृहीत धरून कामासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत बैठक होऊन एक हजार ११ कोटींच्या पायाभूत सुविधा उभारण्यावर चर्चा झाली.