नाशिक रोड: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्यासह राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि रेल्वे शाखेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत प्राथमिक समन्वय बैठक होऊन विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.