water supply project
water supply projectsakal

Nashik Kumbh Mela : कुंभमेळ्यासाठी ४४० कोटींची पाणीपुरवठा योजना; आयुक्त मनीषा खत्रींच्या सूचना

Kumbh Mela 2027: Water Needs of Millions : जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करणे व विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.
Published on

नाशिक- आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने पाणीपुरवठा योजना सक्षम करण्याच्या अनुषंगाने महापालिकेत महत्त्वाची बैठक झाली. त्यात मुकणे धरणाच्या पंपिंग स्टेशनची क्षमतावाढ करणे, विल्होळी येथे २७४ दशलक्ष लिटर क्षमतेच्या जलशुद्धीकरण केंद्राची उभारणी करणे व विल्होळी जलशुद्धीकरण केंद्र ते साधुग्रामपर्यंत मुख्य जलवाहिनी टाकण्यासाठी तातडीने निविदा प्रसिद्ध करण्याच्या सूचना आयुक्त मनीषा खत्री यांनी दिल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com