Nashik Kumbh mela: ''आखाडा परिषदच अस्तित्वात नाही'' महंत सुधीरदास यांचा दावा, कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद पेटला
Mahant Sudhir das: व्यक्तिगत रित्या भाषावाद, प्रांतवाद याच्यात मी पडत नाही. कोणावर आरोप न करता एकत्र येऊन आदर्शवत कुंभमेळा व्हावा अशी अपेक्षा आहे, असंही महंत सुधीरदास म्हणाले.
Nashik Latest News: नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्यापूर्वी वाद उफाळून आलेला आहे. महंत सुधीरदास हे नकली महंत आहेत, अशी टीका त्र्यंबकेश्वरचे शंकरानंद सरस्वती महाराज यांनी केली होती. त्यांच्या टीकेला महंत सुधीरदास यांनी उत्तर दिलं आहे.