नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेवरून गोंधळ

नगरसेवकांच्या आसन व्यवस्थेवरून गोंधळ
Published on: 
एन्कर फोटो : H34096 --------------- नगरसेवकांच्या आसनव्यवस्थेवरून गोंधळ थेट महासभेत प्रशासनाला विचारणार जाब सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. ३१ : नाशिक- त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभपर्वाचा शुभारंभ शनिवारी (ता. ३१) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत ध्वजारोहणाने झाला. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी दीड हजार व्हीआयपी, मंत्री, खासदार, आमदार आणि महापालिकेच्या १२० नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. या वेळी नगरसेवकांसाठी रामतीर्थ आणि गांधी तलावाच्या मध्ये आसनव्यवस्था करण्यात आली होती. मात्र समोरील मंदिरामुळे ध्वजस्तंभाचे दृश्य व्यवस्थित दिसत नसल्याने आणि राखीव जागेवर इतर मान्यवर बसल्याने काही नगरसेवकांना बसण्यास अडचण आली. यामुळे नाराजी व्यक्त करत काही नगरसेवकांनी आसनव्यवस्था सोडली. या वेळी महापालिका आयुक्त मनिषा खत्री यांनी नगरसेवकांशी संवाद साधत पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नगरसेवकांनी गांधी स्मारकात जाण्याची विनंती केली. भाजप शहराध्यक्ष सुनील केदार आणि गटनेते ॲड. श्‍याम बडोदे यांनी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी चर्चा केल्यानंतर पोलिसांनी नगरसेवकांना गांधी स्मारकात प्रवेश दिला. रामतीर्थासमोरील कक्षात नगरसेवक गुरमित बग्गा यांना प्रवेशावरून पोलिसांशी चर्चा करावी लागली, तर उपमहापौर विलास शिंदे यांचाही सुरक्षेबाबत संवाद झाल्याचे समजते. मंत्री महाजन यांच्या मध्यस्थीनंतर हा विषय मार्गी लागला. दरम्यान, प्रथम नागरिक म्हणून महापौर हिमगौरी आडके यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. मात्र ध्वजारोहणाच्या वेळी प्रोटोकॉलनुसार राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ सदस्यांना ध्वजस्तंभाजवळ स्थान असल्याने महापौर थोड्या अंतरावर होत्या. या संपूर्ण प्रकाराबाबत नियोजनात अधिक समन्वय हवा होता, अशी भावना नगरसेवकांनी व्यक्त केली आहे. याबाबत महासभेत चर्चा करून प्रशासनाकडे खुलासा मागण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. -----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.