

Kumbh Mela Fraud
esakal
जळगाव: नाशिक येथे आगामी काळात होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासंदर्भात काही लोकांना बनावट वर्कऑर्डर देऊन आर्थिक फसवणूक केली जात आहे. बनावट वर्कआर्डर देणारे जळगाव, धुळे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांतील पाच जणांचे रॅकेट आहे. सुमारे ५०० ते ६०० कोटींची ही फसवणूक आहे. याबाबत चार- पाच जणांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी (ता. १०) येथे पत्रकार परिषदेत दिली.