पान-२
NSK26H34173
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहनाच्या निमित्ताने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. यावेळी सहभागी झालेले आदिवासी बांधव. (छायाचित्र केशव मते)
NCTY26B61184
रामतीर्थ : येथे शनिवारी सायंकाळी महागोदाआरती करताना आदिवासी बांधव.( छायाचित्र : विकी कदम )
--------
NSK26H34172
नाशिक : गोदावरी महाआरतीवेळी व्यासपीठावर उपस्थित विविध आखाड्यांचे महंत. (छायाचित्र केशव मते)
-----
प्रदूषणमुक्त गोदावरीसाठी हवा सर्वांचा सहभाग
-------------
महाआरतीप्रसंगी राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे नाशिककरांना आवाहन
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. ३१ : सिंहस्थ कुंभमेळा हा देशाची सनातन संस्कृती, श्रद्धा आणि समरसतेचे प्रतीक आहे. या अध्यात्मिक सूत्राने कोट्यवधी श्रद्धाळूंना एका सूत्रात बांधले आहे. शासन-प्रशासनाच्या प्रयत्नातून नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थाचे भव्यदिव्य आयोजन केले जाईल. पण, गोदावरी नदी प्रदूषणमुक्त तसेच स्वच्छतेसाठी सर्वांचा सहभाग महत्वाचा आहे, असे आवाहन राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी नाशिककरांना केले.
-----------------
सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण, गंगा- गोदावरी पंचकोठी पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी सेवा समितीतर्फे गोदाघाटावर शनिवारी (ता.३१) गोदावरीची महाआरती झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरतीप्रसंगी राज्यपाल वर्मा यांनी मार्गदर्शन केले.
राज्यपाल वर्मा पुढे म्हणाले,‘ देशभरात चार ठिकाणी भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातून भाषा, प्रांत आणि समुदायातील भेदभाव दूर होतो. सिंहस्थातून कोट्यवधी देशवासियांना एका सूत्रांत बांधले. नाशिक- त्र्यंबकेश्वरच्या सिंहस्थाला विशेष धार्मिक महत्व असून गोदावरीचे भारतीय सभ्यतेशी अतूट नाते आहे. सिंहस्थातून तिचे महत्व अधोरेखित होते. त्यामुळे गोदावरी नदी प्रदुषणमुक्त राखणे हे सर्वांचे सामुहिक कर्तव्य आहे, असा संदेश त्यांनी दिला. प्रभू रामचंद्र यांच्या वास्तव्यामुळे नाशिकला विशेष धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. सिंहस्थाच्या माध्यमातून नाशिकची वेगळी ओळख जगभरात पोहचविण्याची संधी निर्माण झाली आहे. परंतु, त्यासोबत स्वच्छ आणि सुंदर नाशिकसाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली.
---
१६-१ चौकट
गोदावरीने आर्शिवाद द्यावा
राज्यात सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, संकटाच्या काळात शेतकऱ्यांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभे आहे. पण, हे संकट दूर होतानाच महाराष्ट्राच्या सुख-समृद्धीसाठी गोदावरी मातेनेे आर्शिवाद द्यावे. जेणेकरुन महाराष्ट्र पुन्हा एकदा सुजलाम्-सुफलाम् होईल, अशी प्रार्थना राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी गोदावरी मातेच्या चरणी केली.
--------------