पान-३
NSK26H34277
नाशिक : कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर महाआरतीवेळी खासदार राजाभाऊ वाजेंना मान न दिल्याने कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांच्या दालनात भेट घेतली. यावेळी चर्चा करत असलेले पक्षाचे गटनेते केशव पोरजे व नगरसेवक, पदाधिकारी.
---------------
३६-३
वाजेंच्या अवमानप्रश्नी शिवसेना आक्रमक
प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन, आयुक्तांची दिलगिरी
सकाळ वृत्तसेवा
नाशिक, ता. २ : सिंहस्थ कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याप्रसंगी खासदार राजाभाऊ वाजे यांना दुय्यम वागणूक दिल्याच्या आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने केला आहे. याच्या निषेधार्थ पक्षाने आक्रमक भूमिका घेत सोमवारी (ता.२) सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले. आयुक्त शेखर सिंह प्रोटोकॉलनुसार नियोजन केल्याचे सांगत संभ्रम निर्माण झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यात खासदार वाजे यांचा अवमान झाल्याचे सांगत उबाठा पक्ष आक्रमक झाला आहे. उबाठाने याबाबत प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना धारेेवर धरत जाब विचारला. सोहळ्यात भाजपचे आमदार पहिल्या रांगेत तर नाशिकच्या खासदारांना चौथ्या रांगेत स्थान दिल्याबद्दल आक्षेप घेण्यात आला. खासदार वाजेंना सिंहस्थाच्या बैठकांपासून दूर ठेवले जात असल्याचे सांगत सिंहस्थ नाशिककरांचा आहे की एका पक्षाचा, असा रोखठोक प्रश्न उबाठाने उपस्थित केला. विरोधी पक्षाच्या प्रभागांमध्ये सजावट किंवा भगवे झेंडे लावले नाही, असा जाब विचारताना प्रशासनाने या सोहळ्यात नगरसेवकांची चेष्टा केल्याचा आरोप उबाठातर्फे करण्यात आला. आंदोलनात उबाठाचे गटनेते केशव पोरजे, युवराज आव्हाड, योगेश भोर, विशाल पवार यांच्यासह इतर शिवसैनिक सहभागी झाले.
---
१६-१
अवमानाचा हेतू नव्हता : सिंह
सिंहस्थ ध्वजारोहण सोहळ्यात प्रोटोकॉलनुसार व्यासपीठावर आसनव्यवस्था करण्यात आली होती. ऐनवेळी आसन व्यवस्थेत मागे-पुढे झाल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली. परंतु, कुणाही लोकप्रतिनिधीचा अवमानाचा हेतू नव्हता. यासंदर्भात खासदार वाजे यांच्याशी चर्चा करुन त्यांना स्पष्टता देण्यात आल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले. प्रोटोकॉलनुसारच मांडणी केली असल्याचे सांगत यापुढेही त्यानुसार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
-------------------