
नाशिक : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा अत्यंत प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार यंदा पुण्याचे प्रसिद्ध मराठी नाटककार, अभिनेते आणि नाट्य दिग्दर्शक पद्मश्री सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला. कुसुमाग्रज अर्थात वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मृतिदिनी (१० मार्च) गुरुदक्षिणा हॉलमध्ये सायंकाळी सहाला या पुरस्काराचे समारंभपूर्वक वितरण केले जाणार आहे. गंगापूर रोडवरील प्रतिष्ठानतर्फे सोमवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत ही घोषणा करण्यात आली.