
नाशिक : मकरसंक्रांत, पतंग आणि नाशिककर अशी एक वेगळीच सांस्कृतिक उत्सवाची नाळ जुळलेली आहे. परंतु, या उत्सवाला गेल्या काही वर्षांमध्ये उत्साही पतंगप्रेमीं नायलॉन मांजाच्या आहारी गेल्याने गालबोट लागत आहे. पशुपक्ष्यांप्रमाणेच नागरिकांच्या जीवावर बेतणारे प्रसंग नायलॉन मांजाने घडत आहेत. तरीही पतंगप्रेमींकडून नायलॉन मांजाचा वापर कमी होताना दिसत नाही. पोलिस आयुक्तांनी नायलॉन मांजावर बंदी घातली असली तरीही शहरात विक्री अन् वापर सुरूच असल्याने पोलिसांकडून विक्रेत्यांची धडपकड करीत आत्तापर्यंत लाखोंचे नायलॉन मांजा जप्त केला आहे.