नाशिक- शरणपूर गावठाण येथील ख्रिस्ती जमीन हडपल्याचा आरोप करीत नाशिक डायोसेशन ट्रस्ट असोसिएशन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते तिमथी दहातोंडे यांनी मंगळवारी (ता. १०) दुपारी पोलिस आयुक्तालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. या वेळी सरकारवाडा पोलिसांनी दहातोंडे यास ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.