

नाशिक : राज्यपालपद मिळवून देण्यासाठी चेन्नईच्या आयटी इंजिनिअरला तब्बल १५ कोटींना गंडा घालणाऱ्या नाशिकच्या संशयिताने नागपूरच्या एका संस्थेत अडीच-तीन कोटी रुपये जमा केले. त्याच पैशातून संस्थेने जमीन खरेदी केली असता हा व्यवहार रोखण्यात आला आहे, तसेच या प्रकरणी आणखी एकाचे नाव समोर आले असून, त्याच्या चौकशीतून महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता आहे.