Revenue department corruption Maharashtra
esakal
नाशिक : भूमिअभिलेख कार्यालयाचे बनावट नकाशे व फेरफार दस्तऐवजांच्या आधारे म्हाडासह शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिक तहसील कार्यालयातील आजी-माजी दोन मंडल अधिकाऱ्यांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने दोघांना ३ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली (MHADA fraud case Nashik) आहे. या कारवाईमुळे महसूल व भूमिअभिलेख विभागात खळबळ उडाली आहे.