
नाशिक : मुलभूत सुविधांपैकी सर्वात महत्त्वाच्या आरोग्याच्या क्षेत्रात शहरासह जिल्हा पातळीवर कक्षा रुंदावल्या आहेत. जागतिक स्तरावर प्रगत असे रोबोटिक शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान वर्षभरात अनेक खासगी रुग्णालयांनी स्वीकारले. अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात तज्ज्ञ डॉक्टरांना यश आले. काही कॉर्पोरेट हॉस्पिटलचे नाशिकमध्ये आगमन झाले असून, नाशिकला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु झाल्याने संलग्नित रुग्णालयदेखील नववर्षात रुग्णसेवेत उपलब्ध होईल.