Nashik Vegetable Rates Hike: आठवडे बाजारात पालेभाज्या दुर्मिळ! इतर सर्व भाज्यांच्या दरांतही दुप्पट वाढ

Nashik News : उन्हाच्या तडाख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांसह वेलवर्गीय अशा सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे.
Vegetable
Vegetable esakal

Nashik Vegetable Rates Hike : उन्हाच्या तडाख्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत पालेभाज्या, फळभाज्यांसह वेलवर्गीय अशा सर्व प्रकारच्या भाजीपाल्याच्या आवकेत मोठी घट झाली आहे. याचा परिणाम आठवडे बाजारात भाववाढीत झाल्यामुळे एप्रिलमध्येच सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. (Nashik Leafy vegetables rare in market news)

बाजारात मेथीच्या जुडीसाठी तीस ते चाळीस रुपये तर गावठी कोथिंबिरीच्या चाळीस ते पन्नास रुपये मोजावे लागत होते. इतर भाजीपाल्याच्या दरांत वाढ झाल्यावर एरवी वीस रुपये किलोमध्ये उपलब्ध होणारे बटाट्याचे दरही तीस रुपये किलोपर्यंत पोचले आहेत.

गत महिन्याच्या तुलनेत आठवडे बाजार आवक कमी असल्याने चांगलाच रोडावला आहे. एरवी सप्तशृंगी देवी मंदिरापर्यंत पोचणारा बाजार गणेशवाडीतील मुंजोबा चौकापर्यंतच सीमित झाला होता. पुढील आठवड्यात भाज्यांच्या दरांत आणखी वाढ होण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

भाजीपाल्याचे दर पुढीलप्रमाणे

मेथीची जुडी - ३० ते ४० रू. जुडी.

कोथिंबीर - २० ते ५० रु. जुडी (आकारानुसार)

पालक, शेपू - २० रु. जुडी

वांगी - ४० रु. किलो.

बटाटे - २० ते ३० रु. किलो

टोमॅटो - १० रु. किलो

कारले - ४० रु. किलो.

कोबी गड्डा - १० रु.

फ्लॉवर गड्डा - १५ ते २० रु.

(latest marathi news)

Vegetable
Nashik ZP News : सुट्यांमध्ये प्राथमिक शाळांची डागडुजी; प्राथमिक, माध्यमिक शाळांना 43 दिवस उन्हाळी सुट्या

भुरट्यांपासून सावधान

एकीकडे भाजीपाला महाग झाल्याने महिलांचे बजेट कोलमडले आहे, दुसरीकडे आठवडे बाजारातील भुरटे चोरटेही बाजारात येणाऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाहीत. बाजारातील मोबाईलसह दागिने, पैशांची चोरी थांबायला तयार नाही. विशेष म्हणजे अनेक भाजीविक्रेत्यांना या भुरट्यांची तोंडओळख झाल्याने तेही खरेदीदारांना अशा चोरट्यांपासून काळजी घेण्याचा सल्ला देताना दिसून आले.

Vegetable
Sangali Loksabha: सांगलीत विशाल पाटील एकाकी? मित्रपक्षांना इशारा देत विश्वजीत कदमांचा आघाडीचे काम करण्याचा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com