Legislative Council Elections : विधान परिषदेची निवडणूक स्थगित; निवडणूक आयोगाचा निर्णय

Nashik News : जुलैत रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने रद्द केला आहे.
Maharashtra legislative council
Maharashtra legislative councilesakal

Nashik News : जुलैत रिक्त होणाऱ्या विधान परिषदेच्या चार जागांसाठी जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने रद्द केला आहे. शाळांची सुटी संपल्यावर या निवडणुका होणार असल्याने शिक्षकांना तूर्त निवडणुकीच्या कामातून दिलासा मिळाला आहे. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी १० जूनला मतदान होणार होते. (Legislative Council election postponed)

१३ जूनला निकाल असल्याने लोकसभेपाठोपाठ विधानसभेची आचारसंहिता तोपर्यंत कायम राहणार होती. नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक व अहमदनगर येथील ६५ हजार ४७८ मतदारांची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली आहे. परंतु, शाळांना सुटी असल्याने मतदान कमी होईल, तसेच नाशिक, दिंडोरी व धुळे लोकसभा मतदारसंघाचे मतदान २० मेस होणार आहे.

यात बहुतांश शिक्षक मतदान प्रक्रियेत सहभागी आहेत. मतदान ‘ड्यूटी’वरून आल्यावर शिक्षकांना विधान परिषद निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी दोनच दिवस उरतात. यामुळे शिक्षकांमध्ये अन्यायाची भावना निर्माण झाली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ही निवडणूक २० दिवस पुढे ढकलण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. (latest marathi news)

Maharashtra legislative council
Nashik News : ‘नासर्डी’चा संरक्षक कठडा एका पावसात गायब! वाहन नदीत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यता

यासंदर्भात जिल्हा निवडणूक विभागाकडे त्यांनी अर्ज दिला होता. भारत निवडणूक आयोगाचे सचिव सुमनकुमार दास यांनी मंगळवारी (ता. १४) राज्य निवडणूक आयोगाचे मुख्याधिकारी व सचिवांना पत्र पाठवत निवडणूक स्थगितीचे आदेश दिले. शाळा सुरू झाल्यावर या निवडणुका घेण्यात येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्र निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येईल.

"निवडणूक तूर्त स्थगित झाल्याने शिक्षकांवरील निवडणुकीचा ताण कमी होणार आहे. तसेच, शाळा सुरू झाल्यावर निवडणुका झाल्यास मतदानाची टक्केवारीही वाढण्यास मदत होईल. शिक्षकांना अर्ज सादर करण्याची संधीही मिळणार आहे." - नीलेश साळुंखे, अध्यक्ष, नाशिक पॅरेंट्स असोसिएशन

Maharashtra legislative council
Nashik News : ठाकरे गटातील निफाडचे 5 पदाधिकारी नजरकैदेत! पंतप्रधानांच्या सभेपूर्वी पोलिसांनी घेतले ताब्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com