Nashik ZP News : जिल्ह्यातील 17 कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित! जि. प. कृषी विभागाची कारवाई

Nashik : बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार. तसेच विनापरवाने विक्री होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तालुकास्तरावर १५, तर जिल्हास्तरावर दोन, अशा एकूण १७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.
Licenses of 17 agricultural dealers in district suspended
Licenses of 17 agricultural dealers in district suspendedesakal

Nashik News : जिल्ह्यात खरीप हंगामाला सुरवात झाली असून, निम्म्याहून अधिक टक्के पेरण्या झाल्या आहेत. पेरण्या सुरू झाल्याने शेतकऱ्यांकडून कृषी केंद्रांवर मोठी गर्दी होत आहे. मात्र याचा काही विक्रेते फायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. (Licenses of 17 agricultural dealers in district suspended)

जिल्ह्यात बेकायदेशीरपणे, तर विक्रीसंबंधी काही त्रुटी आढळून आल्याने आठ खत विक्रेत्यांचा, सात बियाणे विक्रेत्यांचा, तर दोन कीटकनाशके विक्री करणाऱ्या, अशा एकूण १७ कृषी विक्री केंद्रांवर विभागातील भरारी पथकाने कारवाई केली असून, त्यांचे परवाने निलंबित केले आहेत. ६४ विक्रेत्यांना माल विक्रीचे आदेश दिले आहेत. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर खते, बियाणे व कीटकनाशके यांचा काळाबाजार. तसेच विनापरवाने विक्री होऊ नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने तालुकास्तरावर १५, तर जिल्हास्तरावर दोन, अशा एकूण १७ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. या भरारी पथकाने आतापर्यंत तीन हजार ५४१ बियाणे विक्री केंद्रांपैकी एक हजार २०५ विक्रेत्यांची तपासणी केली आहे. यातील ६८१ नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले होते.

यामधील आठ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यामुळे यातील सात विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहे. एका विक्रेत्याविरोधात न्यायालयात कायदेशीर कारवाई सुरू आहे. याशिवाय ३९ बियाणे विक्रेत्यांना विक्रीबंदचे आदेश दिले आहे. जिल्हा भरारी पथकाने खत एक हजार ४१५ विक्री केंद्रांची तपासणी केली. तपासणी दरम्यान २२१ नमुने काढण्यात आली होती. यातील १४ नमुने अप्रमाणित सापडले. (latest marathi news)

Licenses of 17 agricultural dealers in district suspended
Nashik AIMA News : आयमातर्फे ऑगस्टमध्ये ‘बिझिनेस मीट-३’! ललित बूब यांची माहिती

त्यातील अनियमितता आढळून आलेल्या दोन खते विक्री केंद्राचा परवाना थेट रद्द करण्याचे आदेश देण्यात आला आहे. १६ खत विक्रेत्यांना खत विक्रीचे आदेश देण्यात आले आहे. आठ खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही भरारी पथकाने केली आहे. जिल्ह्यातील एकूण तीन हजार २६४ कीटकनाशक विक्रेत्यांपैकी आतापर्यंत एक हजार ३६ विक्रेत्यांची तपासणी करण्यात आली आहे.

त्यातील ७१ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले होते. १६.९० लाखांचा जप्त करण्यात आलेल्या एक हजार ३३२ नग कीटकनाशके जप्त करण्यात आले आहे. तपासणीत अप्रमाणित आढळलेल्या सहा विक्रेत्यांना कीटकनाशके विक्रीबंदचे आदेश देण्यात आले आहे.

दोन कीटकनाशके विक्रेत्यांचे परवाना निलंबित केले आहे. एका विक्रेत्याविरोधात पोलिस केस दाखल झालेली आहे. या कारवाईने बोगस खते, बियाणे व कीटकनाशक विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, कृषी विभागाच्या कार्यालयावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Licenses of 17 agricultural dealers in district suspended
Nashik Civil Hospital : पंचनामा न होताच मृतदेह रात्रभर शवविच्छेदन कक्षाबाहेर! ‘सिव्हिल’चा भोंगळ कारभार पुन्हा उघड

कृषी विभागाचे आवाहन

खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये व शासकीय किमतीत खत उपलब्ध व्हावी, यासाठी कृषी विभागाच्या वतीने तपासणी मोहीम राबविली जात आहे. यामुळे विक्रेत्यांनी दक्ष राहून आपला व्यवसाय करावा, असे आवाहन आले आहे. कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आपले विक्री केंद्राच्या दर्शनी भागावर मोठा भावफलक लावावा, तसेच अनुदानित खताची विक्री शासनाने ठरवून दिलेल्या दराने व पक्क्या बिलातच करावी.

असे आवाहन जिल्हा परिषदेच्या जिल्हा कृषी अधिकारी माधुरी गायकवाड यांनी केले आहे. शेतकऱ्यांना अनुदानित खतांची ई पॉस मशिनद्वारेच विक्री करावी, अनियमितता करणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर परवाना रद्दची कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा कृषी अधीक्षक विवेक सोनवणे यांनी दिला आहे.

Licenses of 17 agricultural dealers in district suspended
Nashik News : मत्स्यबीज उत्पादनात नाशिक विभाग दुसऱ्या क्रमांकावर!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com