
नाशिक : महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आपल्या पाच उमेदवारांची घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचीही सहा जागांवर उमेदवारी निश्चिती सुरू आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने कळवण-सुरगाण्यातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात काँग्रेसला चांदवड-देवळा, मालेगाव मध्य व इगतपुरी-त्र्यंबकेश्वर हे मतदारसंघ मिळणार हे निश्चित झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उमेदवार घोषित केले, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निश्चित झाले आहेत. ( list of only 3 Congress seats in district has not been announced aspirants are confused )