Nashik: 'वैशूला संपवलं', होणाऱ्या नवऱ्याला कॉलवर सांगितलं, नंतर उचललं टोकाचं पाऊल; दोघेही लिव्ह इनमध्ये रहायचे

Woman Found Murdered in Nashik: पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार दोघे पूर्वी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.
Nashik

Nashik

esakal

Updated on

इंदिरानगर: येथील वनसंपदा कॉलनीत शुक्रवारी (ता. १७) रात्री धारदार चाकूने खून झालेली तरुणी अमरावती येथील वैष्णवी अनिल आवारे (वय २०) असल्याचे निष्पन्न झाले असून, तिचा खून 'लीव्ह इन' मध्ये राहणारा तिचा मित्र साहिल अशोक लाव्हारे (रा. उमरखेड, जि. यवतमाळ) याने केल्याचे समोर आले आहे. वैष्णवीच्या खुनानंतर फरारी झालेल्या साहिलने अवघ्या काही तासांतच इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकवर कडुनिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याने या घटनेमागील गूढ वाढले आहे. उमरखेड येथे 'लीव्ह इन रिलेशनशिप'मध्ये एकत्र राहिल्यावर नाशिकला येऊन दुसऱ्या तरुणाबरोबर विवाह ठरत असल्याचे सहन न झाल्याने साहिलने हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. तथापि, या घटनेला आणखी वेगळे पदर असू शकतात, तपासात ते पुढे येतील, असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com