Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी, नाशिकमध्ये ‘कास्ट फॅक्टर’ ठरणार प्रभावी

Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघामध्ये जातीनिहाय मतदारांची टक्केवारी मतदारसंघातील जातीप्रभाव स्पष्ट करणारा असल्याने त्या अनुषंगाने राजकीय गणिते मांडली जात आहेत.
Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituencyesakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक व दिंडोरी मतदारसंघामध्ये जातीनिहाय मतदारांची टक्केवारी मतदारसंघातील जातीप्रभाव स्पष्ट करणारा असल्याने त्या अनुषंगाने राजकीय गणिते मांडली जात आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये एकदा निवडून आलेला खासदार दुसऱ्यांदा निवडून येत नाही, अशी परंपरा होती. मात्र २०१९ च्या निवडणुकीमध्ये नाशिककरांनीच ही परंपरा खंडित केली. २०१४ मध्ये शिवसेनेकडून हेमंत गोडसे तब्बल एक लाख ८७ हजार मताधिक्याने निवडून आले. (Caste factor will be effective in Dindori Nashik )

त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीमध्ये त्यापेक्षा अधिक मताधिक्य त्यांना मिळाले. २०१४ व २०१९ च्या या दोन्ही निवडणुकांमध्ये ‘कास्ट फॅक्टर’ प्रभावी ठरला. नाशिक लोकसभा मतदारसंघात त्र्यंबकेश्वर व इगतपुरी हे दोन आदिवासी समाजाचा प्रभाव असलेले तालुके आहेत. त्याशिवाय विधानसभेच्या सहाही मतदारसंघांमध्ये मराठा समाजाव्यतिरिक्त वंजारी, माळी, मुस्लिम, चर्मकार व इतर जातींचा देखील प्रभाव आहे.

अनुसूचित जाती-जमातीमधील घटक जातींचा या मतदारसंघांमध्ये राजकीयदृष्ट्या प्रभाव आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघात अनुसूचित जाती-जमातीव्यतिरिक्त मराठा, वंजारी, माळी, मुस्लिम व विणकर या जात घटकांचा प्रभाव आहे.

अनुसूचित जाती व जमाती समाजाचा या मतदारसंघात अधिक प्रभाव असून, मराठा व ओबीसी या समाजाचे त्रिकोणी राजकारण प्रभावशील आहे. त्यामुळे नाशिक व दिंडोरी या दोन्ही मतदारसंघामध्ये जात फॅक्टर महत्त्वाचा ठरेल, अशी चिन्हे यंदाच्या निवडणुकीतदेखील दिसून येत आहेत. (Nashik Political News)

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : विजय करंजकरांच्या मनात वेगळ्या घराचा विचार : सुधाकर बडगुजर

नाशिक मतदारसंघातील जातीनिहाय प्रमाण (कंसात टक्के)

- खुला प्रवर्ग- ३१.१८

- इतर मागासवर्ग- २८.४७

- अनुसूचित जाती- १०.८५

- अनुसूचित जमाती-१८.२०

- इतर-११.३०

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील जातीनिहाय प्रमाण (कंसात टक्के)

- खुला प्रवर्ग- २२.१८

- इतर मागासवर्ग- २७.६५

- अनुसूचित जाती -७.९८

- अनुसूचित जमाती-३३.४५

- इतर- ८.७४

Nashik Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : भुजबळ मुंबईत, करंजकर शिर्डीत, गोडसे तुळजापूरला; महायुतीतील ट्विस्ट कायम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com