Nashik Loksabha: नाशिकवरून वरिष्ठ नेत्यात वाक्‌युध्द; NCPचे पटेल म्हणतात, नाशिक आमचेच! सेनेचे शिरसाठ म्हणतात, आग्रह नव्हे, हट्ट!

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदार संघाचा तिढा अद्याप सुटत नसला तरी मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे.
Praful Patel & Sanjay Shirsath
Praful Patel & Sanjay Shirsathesakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभेच्या नाशिक मतदार संघाचा तिढा अद्याप सुटत नसला तरी मात्र दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी नाशिकची जागा आमचीच असा दावा केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी मात्र नाशिकची जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रहच नाही तर हट्टसुद्धा आहे असा प्रतिदावा केल्याने नाशिकच्या जागेवरून वाद टोकाला गेला आहे. (Nashik Lok Sabha constituency election 2024 NCP praful Patel shivsena sanjay shirsath news)

नाशिक लोकसभा मतदारसंघाची जागा शिवसेना की राष्ट्रवादी कॉंग्रेस यावर अद्याप निर्णय झालेला नाही. सुरुवातीला शिवसेनेने नाशिकच्या जागेवर दावा करताना शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागण्याच्या सूचना देतानाच विजयाची हॅटट्रिक करण्याचे आवाहन केले होते.

मात्र त्यानंतर लगेचच भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी वरिष्ठांकडे तक्रार करत महायुतीचा प्रोटोकॉल शिंदे यांच्याकडून तोडला जात असल्याच्या तक्रारी केल्या. त्याच्या दुसऱ्या दिवशीच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे पाच आमदार असल्याने नाशिकच्या जागेवर आमचा देखील दावा असल्याचे सांगितले.

त्यानंतर मात्र नाशिकच्या जागेवरून वाद निर्माण झाला. छगन भुजबळ यांचे अचानक नाव चर्चेत आल्याने नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या खात्यात जमा होईल, असे बोलले जात होते. त्यानंतर मात्र अद्याप महायुतीच्या घटक पक्षांनी एकत्रितपणे नाशिकच्या जागेचा निर्णय घेतला नाही. भारतीय जनता पक्ष नाशिकच्या जागे संदर्भात एक पाऊल मागे आल्याचे दिसत असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट व शिवसेनेच्या शिंदे गटात मात्र नाशिकच्या जागेवरून वाक्‌युद्ध रंगले आहे. (Nashik Political News)

Praful Patel & Sanjay Shirsath
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे काँग्रेस सावध; विश्‍वजित, पृथ्वीराज, सावंतांना नागपूरला पाचारण

जागा आमचीच

माध्यमांशी संवाद साधताना प्रफुल्ल पटेल म्हणाले, नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये विद्यमान खासदार शिवसेनेचे असले तरी जागा वाटप होताना थोडी तडजोड करण्याची बाब त्यांनी मान्य केली पाहिजे. भाजपनेही ते मान्य केल्यास आम्हाला बरे वाटेल. नाशिकची जागा नक्कीच आमच्या वाट्याला आली पाहिजे.

राष्ट्रवादीकडे जागा आल्यानंतर उमेदवारी कोणाला द्यायची हा आमचा पक्षांतर्गत विषय आहे. सर्वप्रथम नाशिकची जागा आम्हाला सुटली पाहिजे. नाशिकच्या जागेवरून काही लोक आधीच उड्या मारायला लागतात, कार्यक्रम करून टाकू अशा धमक्या दिल्या जात असल्याबद्दलही पटेल यांनी खंत व्यक्त केली.

आमचाच आग्रह

शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ म्हणाले, नाशिकची जागा शिवसेनेची आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनाच मिळाली पाहिजे. हा आमचा आग्रह नाही तर हट्टसुद्धा आहे. त्यामुळे ही जागा आम्ही मिळविणारच यामध्ये शंका नाही. नाशिकची जागा आता आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न झाला आहे. शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली. आता महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये म्हणून जास्त आग्रह न धरता शिवसेनेच्या ज्या जागा आहेत त्या आम्हाला लढविण्याचा अधिकार असल्याची आमची भूमिका आहे.

Praful Patel & Sanjay Shirsath
Nashik Lok Sabha Election 2024 : उमेदवार अनिश्चिततेमुळे महायुतीमधील इच्छुकांची घालमेल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com