Nashik Lok Sabha Constituency : अपक्ष उमेदवारांचा भर ‘तुतारी’वर; अपक्षांना 190 चिन्हे

Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituency esakal

Nashik Lok Sabha Constituency : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अपक्ष उमेदवारांसाठी निवडणूक आयोगाने १९० चिन्हांची यादी प्रसिद्ध केली आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे चिन्ह असलेल्या तुतारी वाजविणारा मनुष्य या चिन्हाशी नामसाधर्म्य असलेल्या तुतारी चिन्हासाठी अपक्षांनी आतापासून ‘फिल्डिंग’ लावली आहे. या व्यतिरिक्त कपाट, सफरचंद, संगणक, सीसीटीव्ही कॅमेरा, खाट, भेटवस्तू, गॅस सिलिंडर अशा चिन्हांचा त्यात समावेश आहे. ( Independent candidates focus on Tutari )

नाशिक व दिंडोरी मतदारसंघासाठी २० मेस मतदान होईल. त्यासाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ३ मेस अर्ज भरण्याची अंतिम मुदत असेल. ६ मेस माघारीनंतर निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होईल. त्याच दिवशी रिंगणातील उमेदवारांना चिन्हाचे वाटप केले जाणार आहे. निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या यादीनुसार देश व राज्यस्तरावर नऊ राजकीय पक्षांना मान्यता दिली असून, त्यांचे निवडणूक चिन्हही अंतिम करण्यात आले. (Nashik Political News)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : भुजबळ मुंबईत, करंजकर शिर्डीत, गोडसे तुळजापूरला; महायुतीतील ट्विस्ट कायम

याशिवाय, रिंगणात अपक्ष उमेदवारी करणाऱ्यांसाठी आयोगाने १९० चिन्हे अंतिम केले आहेत. त्यात शिट्टी, तंबू, कलिंगड, दूरध्वनी, टी.व्ही. रिमोट, त्रिकोण, मोजे, सोफा, कात्री, सेफ्टी पिन, प्रेशर कूकर, शिवण यंत्र, पेनड्राइव्ह, रोड रोलर, टुथपेस्ट, संगणक माऊस, ऑटोरिक्षा, पाव, कॅमेरा, कॅरम बोर्ड अशा निरनिराळ्या चिन्हांचा समावेश आहे. त्यामुळे निवडणुकीत अपक्षांना कोणते चिन्ह मिळणार, यावरून मतदारांमध्ये आता उत्सुकता लागून राहिली आहे.

या पक्षांना मान्यता

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मान्यताप्राप्त राष्ट्रीय व राज्यस्तरीय नऊ पक्ष आहेत. आम आदमी पक्ष, बहुजन समाज पक्ष, भारतीय जनता पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी), काँग्रेस, नॅशनल पीपल्स पार्टी, मनसे, शिवसेना दोन्ही गट तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांचा समावेश आहे.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : नाशिकच्या जागेचा तिढा कायम; पंतप्रधानांच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे चर्चा लांबणीवर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com