Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी मतदारसंघात उमेदवारीत कोकणा समाजाचे वर्चस्व

Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बिगर आदिवासी तालुक्यातील मतदार निश्चित करत असले तरी राखीव असलेल्या मतदारसंघात आतापर्यंतच्या उमेदवारीत आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे.
Lok Sabha Constituency
Lok Sabha Constituencyesakal
Updated on

Nashik Lok Sabha Constituency : दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा खासदार हा बिगर आदिवासी तालुक्यातील मतदार निश्चित करत असले तरी राखीव असलेल्या मतदारसंघात आतापर्यंतच्या उमेदवारीत आदिवासी कोकणा समाजाचे वर्चस्व असल्याचे दिसून येत आहे. मतदारसंघात एकूण (सन २०११ च्या जनगणनेनुसार) ७ लाख ६७ हजार ५८५ आदिवासी मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख ८८ हजार ९५७ हे कोकणा समाजाचे मतदार आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून कोकणा आदिवासी समाजातूनच उमदेवारीला प्राधान्य दिले जाते. (Nashik Lok Sabha Dindori constituency dominated by Konkani community marathi news )

शासन स्तरावर जातीनिहाय वर्गवारीची यादी तयार केली जात नाही. केवळ मतदारांची यादी तयार केली जाते. मात्र गत काही वर्षांपासून निवडणूक ही जातीच्या मुद्यावर लढविली जात असल्याने उमेदवारांकडून जातीनिहाय वर्गवारीची यादी तयार केली जाते. या यादीचा अभ्यास करुन, जातीय बलाबल बघूनच मतदारसंघात पक्षाकडून उमेदवार उतरविला जात असल्याचे दिसत आहे.

दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील ६ विधानसभा मतदारसंघांपेकी दिंडोरी, पेठ, सुरगाणा, कळवण या तालुक्यांमध्ये आदिवासी समाजाचे प्राबल्य आहे. यापैकी पेठ आणि सुरगाणा हे तालुके आदिवासीबहुल आहेत. त्यापाठोपाठ दिंडोरी व कळवण या तालुक्यांमध्ये आदिवासींची संख्या आहे. आदिवासी समाजामध्ये हिंदू कोकणा, कोळी महादेव, भिल्ल, वार्ली अशा चार जातींचा समावेश आहे.

आदिवासींचे प्राबल्य बघता २०११ च्या जनगणनेनुसार ७ लाख ६७ हजार ५८५ आदिवासी मतदार आहेत. त्यापैकी ३ लाख ८८ हजार ९५७ हे कोकणा समाजाचे मतदार आहेत तर २ लाख ३० हजार ९७६ महादेव कोळी समाजाचे, १ लाख १७ हजार ८०४ भिल्ल समाजाचे तर २७ हजार ४६१ वार्ली समाजाचे मतदार आहेत. इतर आदिवासींची संख्या २ हजार ३८७ आहे तर अनु. जातीचे ६६ हजार २२६ मतदार आहेत.  (latest marathi news)

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency: नाशिक, दिंडोरीत काँग्रेस 25 वर्ष उमेदवारीपासून वंचित

इतर मध्ये ११ लाख ५६ हजार ३० मतदार आहेत. सन २००९, २०१४ मध्ये दोन वेळा दिंडोरीतून खासदार झालेले हरिश्चंद्र चव्हाण हे कोकणा समाजाचेच प्रतिनिधीत्व करतात, तर २०१९ च्या खासदार डॉ. भारती पवार याही आदिवासी कोकणा समाजाच्याच आहेत. याचबरोबर माकपचे जे.पी. गावितही याच समाजाचे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आदिवासी कोकणा समाजाचाच वरचष्मा दिसून येतो. वास्तविक, राजकारणात जातीयवाद करु नये हा आदर्शवाद झाला.

प्रत्यक्षात बहुतांश ठिकाणी जातीच्या समीकरणांच्याच आधारावर निवडणूका लढविल्या जातात. जे मतदारसंघ राखीव नाहीत, त्या मतदारसंघात मराठा, ओबीसी, वंजारी, माळी, तेली आदी जातींच्या मतदारांवर मदार असते. तर राखीव मतदारसंघात पोट जातींना तितकेच महत्व असते.

दिंडोरी मतदारसंघाचा विचार करता, महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादीकडून उमेदवारी करणारे भास्कर भगरे हे कोळी समाजाचे प्रतिनिधी आहेत. तर डॉ. भारती पवार या आदिवासी कोकणा समाजाच्या आहेत. मात्र या जातींव्यतीरिक्तचा समाजही या दोघांना मानणारा आहे. त्यामुळे यंदा दिंडोरीत कोण बाजी मारते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Lok Sabha Constituency
Nashik Lok Sabha Constituency : शहर-जिल्हा काँग्रेस झाली विना प्रभारी; राजू वाघमारे यांनी सोडली काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com