Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीत उमेदवारीबाबत विसंवाद, गोंधळ! भाजप कांदाविरोधक; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

Political News : महायुतीच्या जागा वाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीकास्त्र करत जागा वाटपात महायुतीत विसंवाद असल्याचे सांगितले.
Jayant Patil on Mahayuti
Jayant Patil on Mahayutiesakal

Nashik Lok Sabha Election 2024 : महायुतीच्या जागा वाटपावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी टीकास्त्र करत जागा वाटपात महायुतीत विसंवाद असल्याचे सांगितले. दुसऱ्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार नाही. आपल्या पक्षाचाच उमेदवार उभा करा, अशी त्यांची मानसिकता आहे. त्यामुळे उमेदवार ठरविण्यास त्यांचा विलंब होत आहे. उमेदवारांच्या बाबतीत एवढा गोंधळ असेल तर लोकसभेत कसे लोकप्रतिनिधित्व करतील, अशी शंका लोकांच्या मनात येईल, असे पाटील यांनी सांगितले. (Nashik Lok Sabha Election 2024 Disagreement Confusion regarding mahayuti Candidates news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शनिवारी (ता. २०) नाशिक जिल्हा दौऱ्यावर होते. त्या वेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. पाटील म्हणाले, की दिंडोरी मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भास्कर भगरे हे उमेदवार उभे आहेत. नियोजन करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे.

दिंडोरी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांना बोलावले होते. निवडणुकीसाठी एक महिन्याचा कालावधी असल्याने नियोजन करण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. महायुतीतील जागा वाटपावर बोलताना पाटील यांनी महायुतीत विसंवाद असल्याने, तसेच आपल्या पक्षाच्या उमेदवारी करण्याच्या मानसिकता असल्याने उमेदवारीबाबत विलंब होत असल्याचे सांगितले.

मंत्री छगन भुजबळ यांच्याबाबत मला माहीत नाही त्यांच्या पक्षात काय चालू आहे. आमच्या पक्षात असताना ते आमचे नेते होते. तिकडे गेल्यावर त्यांच्यात काय परिस्थिती आहे मला कसे कळणार, असे त्यांनी या वेळी सांगितले. कांदा प्रश्नावरही पाटील यांनी या वेळी भाष्य केले.  (Nashik Political News)

Jayant Patil on Mahayuti
Dindori Lok Sabha Constituency: माकपच्या भूमिकेबाबत पवारांशी चर्चेअंती तोडगा काढू : पाटील; जे. पी. गावित मात्र उमेदवारीवर ठाम

पाटील म्हणाले, की कांद्याच्या बाबतीत वाईट पद्धतीने शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. भारतीय जनता पक्ष केंद्राचा आणि राज्याचे नेतृत्व करत आहे. कांदा उत्पादक त्यांना मतदान करणार नाही. त्यांना बहिष्कार टाकायचे ठरविले आहे. भारतीय जनता पक्ष हा कांद्याचा विरोधक झाला. त्यामुळे या भागातला शेतकरी मतदानाची वाट बघत आहे.

मतदानातून ते नाराजी व्यक्त करतील, असा विश्वास पाटील यांनी या वेळी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री अजित पवार, आमदार रोहित पवार यांच्या आरोप-प्रत्यारोपांवर पाटील यांनी भाष्य करण्याचे या वेळी टाळले. या वेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे आदी उपस्थित होते.

Jayant Patil on Mahayuti
Solapur Lok Sabha Election : अनुसूचितच्या आठ जातींमधील ३८ उमेदवार; कर्नाटकातील वड्डर, बेडा जंगमचा राजकीय प्रयोग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com