Nashik Lok Sabha Election : प्रत्येक मशिनचा नंबर उमेदवारांच्या मोबाईलवर; लोकसभा निवडणूक मतमोजणी

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना निकालाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे.
nashik Lok Sabha Election
nashik Lok Sabha Electionesakal
Updated on

Nashik News : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर आता निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले असताना निकालाची प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनही सज्ज झाले आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक बुथवर वापरात आलेले बॅलेट युनिट (बीयू), कंट्रोल युनिट (सीयू) व व्हीव्हीपॅट यांचे अद्वितीय (युनिक) क्रमांक उमेदवारांना व्हॉट्सॲप, ई-मेलद्वारे पाठवले आहेत. (Nashik Lok Sabha Election)

उमेदवारांच्या प्रतिनिधींनी या क्रमांकाची पडताळणी करुन घ्यावी. त्यांची खात्री झाल्यानंतरच हे कंट्रोल युनिट उघडण्यात येणार असल्याने प्रक्रियेत अधिक पारदर्शकता येणार आहे. नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी येत्या ४ जून रोजी अंबड एमआयडीसीतील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये होणार आहे.

तत्पूर्वी, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे ‘स्ट्राँग रुम’च्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यामुळे याठिकाणी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. काँग्रेसचे खासदार कपील सिबल यांनी मतमोजणीच्या वेळी उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी काय काळजी घ्यावी, याविषयी माहिती दिली आहे. त्यादृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील आपल्या उमेदवारांना सूचना पाठवल्या आहेत.

त्यात उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींनी काय काळजी घ्यावी, कंट्रोल युनिटचा युनिक क्रमांक एकसारखा आहे का, याची खात्री अगोदर करुन घ्यावी. मतदानासाठी वापरात आलेले मशिन्स आणि मोतमोजणी होत असतानाचे मशिन्स एकसारखे आहेत, याची खात्री झाल्याशिवाय मतमोजणीस अनुमती देऊ नये, असे आदेश आहेत. (latest marathi news)

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : महाविकास आघाडीकडून स्ट्रॉग रूममध्ये प्रतिनिधी

त्यामुळे निवडणूक व मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शी असावी, यादृष्टीने निवडणूक विभागाने मतमोजणीसाठी वापरात आलेल्या मशिन्सची माहिती मतदानापूर्वीच पाठवलेली आहे. तसेच बदलण्यात आलेल्या मशिन्सची माहितीही उमेदवारांना तत्काळ ई-मेल व व्हॉट्सॲपद्वारे कळवलेली आहे. त्यांचे क्रमांक हे उमेदवारांकडे आहेत.

मतमोजणीच्या वेळी कंट्रोल युनिटचा क्रमांक एकसारखा असल्याची खात्री उमेदवार प्रतिनिधींना करुन घ्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे, कुठल्या मतदान केंद्रावरील मशिन मतमोजणीच्या वेळी कुठल्या टेबलवर उघडले जाणार आहे, याविषयीची माहितीही त्यांना लेखी स्वरुपात देण्यात आली आहे. त्यामुळे प्रक्रियेत अत्यंत पारदर्शकता राखण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरु आहेत.

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : ‘भटकती आत्मा’, ‘नकली संतान’ ते ‘चोरांचे सरदार’व्हाया ‘टरबूज’! व्यक्तिगत टीका-टिपण्णीचा स्तर घसरला

नाशिक लोकसभेचा आढावा

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त सर्व अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. यात प्रक्रिया पार पाडताना काय काळजी घेण्याची आवश्‍यकता आहे, उमेदवारांनी आक्षेप घेतल्यास निवडणूक निर्णय अधिकार्यांशी संपर्क साधण्याच्या सूचना करण्यात आल्या. प्रक्रिया अधिक पारदर्शक कशी राहिल, यादृष्टीने सर्वांनी लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. जिल्हाधिकारी जलज शर्मा हे मुंबईला असल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत ही बैठक पार पडली.

"मतमोजणीची प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी मतदानापूर्वीच उमेदवारांना मतदानासाठी वापरात आलेल्या मशिन्सचे अद्वितीय क्रमांक कळवले आहेत. बदलण्यात आलेल्या मशिन्सविषयी त्याच दिवशी माहिती दिली. मतमोजणी करताना कुठल्या केंद्राचे मशिन्स कुठल्या टेबलवर येणार आहे, याचीही माहिती उमेदवारांना आत्ताच दिली आहे. त्यांच्या शंकांचे पूर्ण निरसन केले जाईल." - बाबासाहेब पारधे, निवडणूक निर्णय अधिकारी, दिंडोरी

nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Constituency : पूर्वमधून महायुतीला लीड; पश्चिम, मध्यकडे लक्ष

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.