Nashik Lok Sabha Election : वाढत्या तापमानात चर्चांना रंगत

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे.
Discussion of election
Discussion of electionesakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजला असून, आता गावगाड्यातील राजकारण तापू लागले आहे. निवडणुकीत रंग चढायला लागला असून, कार्यकर्तेही आता सज्ज झाले आहेत. चौकाचौकांत, कट्टया-कट्ट्यावर, एसटी प्रवासात, गावातील पारावरही सर्वत्र निवडणुकीची चर्चा रंगत आहे. सगळीकडे सारखीच स्थिती असते, मतदारसंघात उमेदवार कोणीही उभे राहो अन् कोणीही निवडून येवो. ()

आपणाला कोण नाही, अशी कुजबुज मतदारांमध्ये होताना दिसून येत आहे. निवडणुकीच्या आखाड्यात उमेदवार आता नव्याने रंग भरणार आहेत. उमेदवार आर या पार असा पवित्रा घेऊन निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. होळीनंतरही कार्यकर्त्यांची राजकीय धुळवड सध्या ग्रामीण भागात सुरूच असल्याचे चित्र आहे. दरम्यान, निवडणुकीचा आखाडा अद्याप म्हणावा तसा रंगला नसला तरी चिन्ह वाटपानंतर राजकारणाचा खरा रंग दिसणार आहे.

लोकसभा निवडणुकीत बदललेली राजकीय समीकरणे, आरोप- प्रत्यारोपांमुळे ग्रामीण भागातील वातावरण ढवळून निघणार आहे. उमेदवारांनी, त्यांच्या कार्यकत्यांनी आयुधे सज्ज केली आहेत. ऐन उन्हाळ्यात लोकसभा निवडणूक असल्यामुळे विविध पक्षांच्या उमेदवारांपुढे मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान राहणार आहे. प्रचार करताना उमेदवारांना चांगलाच घाम फुटणार आहे.

प्रखर उन्हाच्या तडाख्यामुळे प्रचाराला फटका बसणार असून, उमेदवार सकाळी व दुपारनंतर प्रचार करतानाचे चित्र दिसणार आहे. प्रचारासाठी खांद्यावर उपरणे टाकून कार्यकर्तेही पोहोचणार आहेत. मार्चमध्येच ३५ ते ४० अंश सेल्सिअसवर पारा गेला असल्याने आता पारावरच्या या चर्चा रात्री उशिरापर्यंत रंगत असल्याचे चित्र खेड्यापाड्यांत आहे. (latest marathi news)

Discussion of election
Nashik Lok Sabha Election : नाशिक मतदारसंघात सस्पेन्स कायम, इच्छुक उमेदवार नाशकात परतले

समाजमाध्यमांवर जोरदार प्रचार सध्या सुरू आहे. प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा झाल्याने आता त्या-त्या पक्षांचे कार्यकर्ते आपलाच नेता कसा 'पॉवरफूल' आहे, हे दाखविण्यासाठी विविध व्हिडीओ क्लिप 'व्हायरल' करत असून, अनेकजण नेत्यांना 'ट्रोल' देखील करीत आहेत.

सध्याच्या परिस्थितीत समाजमाध्यमांद्वारे प्रचाराला अधिक महत्त्व आल्याने मतदारदेखील या प्रचाराकडे पाहून व्हिडीओमधील बाबी व सत्य परिस्थिती याची तुलना करताना दिसून येत आहेत.प्रामुख्याने शेती, उद्योगधंदे, शिक्षण, रस्ते ,पाणी प्रश्न, वीज प्रश्न, शेतमालाचे भाव, दूध प्रश्न, बेकारी आदी मुद्यांचा यात समावेश आहे.

आतापर्यंत झालेला विकास कोणता व सर्व सामान्यांना नेमके काय हवे, याबाबत गावाच्या पारावर चर्चा रंगू लागल्याचे दिसते विशेष म्हणजे आजवर कधीही न झालेल्या एवढ्या क्लिष्ट राजकीय समीकरणांमुळे प्रत्येकजण आपआपल्या नेत्यांची पाठराखण कशी करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Discussion of election
Nashik Lok Sabha Election : 10 हजारांच्या आतील खर्च ‘रोख’; उमेदवारांची अडचण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com