Lok Sabha Election : राज्यातील 6 खासदारांची हॅटट्रिक

Lok Sabha Election : राज्यातील लोकसभा निवडणूक या वेळी मराठा समाजाचे २६ खासदार विजयी झाले. सहा खासदारांनी हॅटट्रिक साधली.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal

Nashik News : राज्यातील लोकसभा निवडणूक या वेळी विविध राजकीय मुद्द्यांमुळे चर्चेतील ठरली. त्याचप्रमाणे या निवडणुकीची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या वेळी मराठा समाजाचे २६ खासदार विजयी झाले. सहा खासदारांनी हॅटट्रिक साधली. याउलट अकरा जणांची हॅटट्रिक हुकली. हॅटट्रिक केलेल्या सहा खासदारांमध्ये भाजपचे, शिवसेना व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे प्रत्येकी दोन खासदार आहेत. (Lok Sabha Election Hat trick of 6 MPs from state)

रावेर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या भाजपच्या रक्षा खडसे या एकमेव महिला खासदार आहेत. त्यानी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे श्रीराम पाटील यांचा पराभव केला. अन्य हॅटट्रिक केलेल्या खासदारांमध्ये भाजपचे दिग्गज नितीन गडकरी (नागपूर), शिवसेनेचे प्रताप जाधव (बुलडाणा), श्रीकांत शिंदे (कल्याण) व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते अरविंद सावंत (दक्षिण मुंबई) व संजय जाधव (परभणी) यांचा समावेश आहे.

हॅटट्रिकची संधी हुकलेल्या अकरा जणांमध्ये भाजपचे सहा खासदार आहेत. त्यांना ॲण्टी इन्कमबन्सी व अन्य मुद्द्यांचा फटका बसला. पक्षाने उमेदवार बदलले असते तर काही जागांवर वेगळे चित्र असते. हॅटट्रिक हुकलेल्या भाजप खासदारांमध्ये डॉ. हीना गावित (नंदुरबार), डॉ. सुभाष भामरे (धुळे).

रामदास तडस (वर्धा), अशोक नेते (गडचिरोली-चिमूर), कपिल पाटील (भिवंडी), संजय काका पाटील (सांगली) यांचा समावेश आहे. शिवसेनेचे हेमंत गोडसे (नाशिक), राहुल शेवाळे (दक्षिण मध्य मुंबई) व संजय मंडलिक (कोल्हापूर) या तिघांची हॅटट्रिक हुकली. शिवसेना (उद्धव ठाकरे) यांचे राजन विचारे (ठाणे) व विनायक राऊत (रत्नागिरी-सिंधुदुर्ग) यांना हॅटट्रिक साधता आली नाही. (latest marathi news)

Lok Sabha Election
Dhule Lok Sabha Constituency: भाजप नको म्हणून काँग्रेसला मतदान! मताधिक्यप्रश्‍नी पाच मतदारसंघांनी डॉ. भामरेंची साथ सोडली

सुप्रिया सुळे यांचा चौकार

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षा सुप्रिया सुळे यांनी चौकार लगावला. २००९ पासून त्या बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यापाठोपाठ २०१४, २०१९ व २०२४ असे सलग चार विजय संपादन केले. या वेळी त्यांच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा पवार यांचा पराभव केला.

रावसाहेब दानवे षटकारापासून वंचित

क्रिकेटमध्ये एका चेंडूवर षटकार म्हणजे सर्वाधिक रन. राजकारणात भल्याभल्यांना हे शक्य नसते. लोकसभा सहा वेळा काबीज केलेले बोटावर मोजता येतील इतकेच खासदार आहेत. भाजपचे दिग्गज नेते रावसाहेब दानवे (जालना) हे १९९९, २००४, २००९, २०१४ व २०१९ असे सलग पाचवेळा विजयी झाले आहेत. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत ते षटकार मारणार. विक्रमी मताधिक्याने विजय होणार, असे भाषणात वारंवार सांगत होते. काँग्रेसच्या डॉ. कल्याण काळे यांनी त्यांचा पराभव करून त्यांना षटकारपासून वंचित ठेवले.

हॅटट्रिकच्या उंबरठ्यावरील चौघांना उमेदवारी नाकारली

लोकसभा निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा नशीब अजमावत हॅटट्रिक करण्यासाठी आसुसलेल्या भाजपचे संजय धोत्रे (अकोला) गोपाळ शेट्टी (उत्तर मुंबई), पूनम महाजन (उत्तर मध्य मुंबई) व शिवसेना कृपाल तुमाने (रामटेक) यांना उमेदवारी मिळाली नाही.

Lok Sabha Election
Sangli Lok Sabha : खांद्यावर हात टाकत प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विशाल पाटलांना दिला महत्त्वाचा 'कानमंत्र'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com