Nashik Lok Sabha Election : 3 महिन्यांत 87 हजार मतदारांची वाढ; दिंडोरीत 21 हजार 666 मतदारांची भर

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची मतदार नोंदणी पूर्ण झाली असून गेल्या तीन महिन्यांत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तब्बल ८७ हजार ३७१ मतदारांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली आहे.
Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election 2024esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीची मतदार नोंदणी पूर्ण झाली असून गेल्या तीन महिन्यांत नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांमध्ये तब्बल ८७ हजार ३७१ मतदारांनी अगदी शेवटच्या दिवसापर्यंत मतदार नोंदणी केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मतदारांचा आकडा ४८ लाख ७४ हजारांच्या जवळपास जाणार आहे. अगदी शेवटच्या टप्प्यात ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने मतदार नोंदणी केलेल्या अर्जदारांचे अर्ज पडताळणी केली जाणार आहे. ( Increase of 87 thousand voters in 3 months in district )

त्यानंतर जिल्हा निवडणूक विभागामार्फत ३ मे रोजी अंतिम मतदार यादीची घोषणा करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी २३ जानेवारी २०२४ रोजी जिल्ह्याची प्रारुप मतदार यादी जाहीर केली होती. २३ जानेवारी ते २४ एप्रिल २०२४ या कालावधीत मतदार नोंदणी सुरुच ठेवण्यात आली. या तीन महिन्यांच्या कालावधीत ८७ हजारांवर मतदारांनी अर्ज केला. यात नाशिक पश्‍चिम या विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक १५ हजार ४०९ अर्ज प्राप्त झाले.

तर कळवणमधून सर्वात कमी म्हणजेच एक हजार ८१४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे एकूण मतदारांच्या संख्येत वाढ झाली असून, नाशिक लोकसभा मतदारसंघात २० लाख ४८ हजार मतदार आहेत. तर दिंडोरी १८ लाख ६३ हजारांवर जावून पोहोचला आहे. वाढीव मतदानाचा कोणत्या उमेदवाराला फायदा होतो आणि कुणाला तोटा हे येत्या ४ जून रोजी निकालाअंती स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात मतदार – ४८,७४०००

नाशिक लोकसभा-२० लाख ४८ हजार २७०

दिंडोरी लोकसभा-१८ लाख ६३ हजार ३९६  (Nashik Political News)

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : सर्वच घटक पक्षांना हवीय नाशिकची जागा : केशव उपाध्ये

लोकसभानिहाय मतदार संघ-

नाशिक लोकसभा-नाशिक पुर्व, नाशिक मध्य, नाशिक पश्चिम, सिन्नर, देवळाली, इगतपुरी

दिंडोरी लोकसभा- नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी

मतदान केंद्र

नाशिक लोकसभा- १९०८ असून सहाय्यकारी १४ केंद्रांची संख्या मिळून ती संख्या १९२२ इतकी आहे.

दिडोरी- १८७६ केंद्र असून, सहाय्याकारी ३४ केंद्र मिळून १९१० इतकी केंद्र असतील.

जिल्ह्यातील २२ केंद्र संवेदनशील

जिल्ह्यात २२ मतदान केंद्र संवेदनशील आहेत. त्यातील १९ नाशिक लोकसभा व तीन दिंडोरीत आहेत. नाशिकमधील १९ पैकी १७ हे शहरातील तर २ केंद्र इगतपुरीतील आहेत. तसेच दिंडोरीतील अलंगुणची २ व देवळ्यातील एका केंद्राचा समावेश आहे.

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणूक लढण्यासाठी भुजबळांवर दबाव; निर्णय मागे घेण्याची एकमुखी मागणी

मतदारसंघनिहाय वाढीव मतदार

नाशिक लोकसभा

नाशिक मध्य-६७१३

नाशिक पश्‍चिम-१५४०९

नाशिक पूर्व-१०२२६

देवळाली-५८०१

सिन्नर-४६११

इगतपुरी-४१३२

दिंडोरी लोकसभा

नांदगाव-५०५७

येवला-४६८८

निफाड-३९४६

दिंडोरी-२४८७

चांदवड-३६७४

कळवण-१८१४

धुळे लोकसभा

मालेगाव मध्य-५८१४

मालेगाव बाह्य-७९९४

बागलाण-५००५

एकूण-८७ हजार ३७१

Nashik Lok Sabha Election 2024
Nashik Lok Sabha Election : निवडणूक प्रशिक्षणास दांडी! जिल्ह्यात 52 निरीक्षकांना नोटिसा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com