Nashik Lok Sabha Election : 'वोट कर नाशिककर' उपक्रम ठरवा यशस्वी : जलज शर्मा

Lok Sabha Election : मॅरेथॉन स्पर्धेतील आयोजन ज्याप्रमाणे चार टप्प्यात केले जाते, व चौथा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा असतो.
Collector Jalaj Sharma unveiling the logo of 'Vote Kar Nashikkar' campaign. Neighbor CEO Ashima Mittal etc.
Collector Jalaj Sharma unveiling the logo of 'Vote Kar Nashikkar' campaign. Neighbor CEO Ashima Mittal etc.esakal

Nashik Lok Sabha Election : मॅरेथॉन स्पर्धेतील आयोजन ज्याप्रमाणे चार टप्प्यात केले जाते, व चौथा टप्पा हा अत्यंत महत्त्वाचा असतो. त्याप्रमाणे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला मतदान हा महत्त्वाचा टप्पा यशस्वी करायचा आहे. यासाठी भरघोस मतदान करताना 'वोट कर नाशिककर' उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले. (Nashik Lok Sabha Election Jalaj Sharma appeal to Vote Kar Nashikkar initiative successful marathi news )

सोमवारी (ता. ८) नाशिक सिटीझन फोरमतर्फे (एनीसीएफ) ‘वोट कर नाशिककर’ मोहिमेच्या लोगो अन् जिंगलचे अनावरण श्री. शर्मा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, एनसीएफ अध्यक्ष आशिष कटारिया, बांधकाम व्यावसायिक जितूभाई ठक्कर, उद्योजक हेमंत राठी, विक्रम सारडा उपस्थित होते. (latest marathi news)

Collector Jalaj Sharma unveiling the logo of 'Vote Kar Nashikkar' campaign. Neighbor CEO Ashima Mittal etc.
Nashik Lok Sabha Election : पक्षीय उमेदवाराला एकच, अपक्षांना हवे 10 सूचक; निवडणूक नियमावली

लोकशाहीच्या हितासाठी सर्वांच्या पुढाकाराने प्रयत्न करणार आहोत. मतदान जनजागृती अभियानात वोट कर नाशिककर ही मोहीम मैलाचा दगड ठरणार आहे. येत्या निवडणुकीत ८० ते ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान व्हावे यासाठी या एनसीएफ सारख्या घटकांचा सहभाग महत्वाचा आहे असे श्रीमती. मित्तल म्हणाल्या.

मतदान जनजागृती वाढविण्यासाठी विक्रम सारडा, सचिन जोशी, हरीश बैजल, नंदन दीक्षित, भूषण मटकरी यांनी नवनवीन संकल्पना मांडल्या. प्रास्ताविक विक्रांत तांबे यांनी तर सूत्रसंचालन सचिन अहिरराव आभार कृणाल पाटील यांनी मानले.

Collector Jalaj Sharma unveiling the logo of 'Vote Kar Nashikkar' campaign. Neighbor CEO Ashima Mittal etc.
Nashik Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीसाठी 29 सूक्ष्म निरीक्षक नियुक्त! प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांची माहिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com