Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या जागेसंदर्भात राष्ट्रवादीची आज बैठक

Nashik : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची तातडीची बैठक गुरुवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये बोलाविण्यात आली आहे.
Nashik Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभेच्या नाशिक मतदार संघामधून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेवर दावा अद्याप सोडलेला नाही त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण कार्यकारिणीची तातडीची बैठक गुरुवारी (ता. २५) सकाळी ११ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन मध्ये बोलाविण्यात आली आहे. नाशिक लोकसभेच्या जागेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. (NCP meeting today regarding Nashik seat )

दोन दिवसांनी नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज भरले जाणार आहे. अशा परिस्थितीमध्ये महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर झालेला नाही. सन १९८५ वगळता भारतीय जनता पक्षाचा एकही खासदार नाशिक लोकसभा मतदार संघातून निवडून आलेला नाही. शहरातील विधानसभेचे तीन मतदारसंघात आमदार व महापालिकेत सत्ता असताना देखील युतीमुळे भाजपला जागा मिळालेली नाही. त्यामुळे भाजपकडून जागेची मागणी करण्यात आली.

शिवसेनेच्या शिंदे गटाकडून देखील दहा वर्षे खासदार असल्याने नाशिकच्या जागेवर दावा करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाकडून देखील जिल्ह्यात पाच आमदार असल्याने जागा आम्हालाच हवी अशी आग्रही भूमिका मांडण्यात आली. मनसेकडूनही एक प्रयत्न चाचपडून बघण्यात आला. नाशिकच्या जागेसाठी अंतर्गत स्पर्धा सुरू असतानाच छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत आले. (latest marathi news)

Nashik Lok Sabha Election
Nashik News : विशेष मोहिमेंतर्गत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा; इ-चलानद्वारे दंड आकारणी

परंतु विरोध लक्षात घेता श्री. भुजबळ यांनीच निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु भुजबळ यांनीच निवडणूक लढवावी असा दबाव वाढू लागला. एकीकडे भुजबळ यांनी उमेदवारीच्या स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी दुसरीकडे जागेच्या स्पर्धेत राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचे जाहीर केले, त्यामुळे नाशिकच्या जागेसंदर्भातील ट्विस्ट अद्यापही कायम आहे.

राष्ट्रवादी आज दावा करणार

अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला असला तरी राष्ट्रवादी काँग्रेसने नाशिकच्या जागेवरचा दावा कायम ठेवला आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची बैठक आज बोलावण्यात आली आहे. याच पदाधिकाऱ्यांशी वन टू वन चर्चा करून निर्णय घेतला जाण्याची शक्यता असून या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन देखील केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Nashik Lok Sabha Election
Nashik News : फार्मास्युटिकल मेडिसीन, हेल्थकेअर अॅडमिनीस्ट्रेशन, पब्लिक हेल्थला प्रवेश सुरू; 20 मेपर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com