Nashik Lok Sabha Election : मतदान केंद्रात मोबाईलसह कोणतीही वस्तू नेण्यास मज्जाव

Lok Sabha Election : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या मतदारास मोबाईलसह कोणतीही वस्तू वा ओळखपत्र वगळता काहीही नेता येणार नाही.
Deputy Commissioner of Police Prashant Bachhav giving instructions to the police officers who came to the polling station
Deputy Commissioner of Police Prashant Bachhav giving instructions to the police officers who came to the polling station esakal

Nashik News : मतदान केंद्राच्या १०० मीटरच्या आवारात मतदानासाठी येणाऱ्या मतदारास मोबाईलसह कोणतीही वस्तू वा ओळखपत्र वगळता काहीही नेता येणार नाही. तसेच, मतदानानंतर कोणतीही व्यक्ती आवारात थांबणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी शहरातील मतदान केंद्रावर बंदोबस्तासाठी आलेल्या अंमलदार-अधिकाऱ्यांना दिल्या. (Prohibited to carry any item including mobile phone in polling station)

नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (ता.२०) मतदान होणार आहे. यासाठी शहरासह परराज्यातील पोलिस अंमलदार-अधिकारी बंदोबस्तासाठी आले आहेत. मुख्यालयातील बॅरेक १७ या ठिकाणी बंदोबस्तासाठी आलेल्या अंमलदार-अधिकाऱ्यांना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी सूचना केल्या.

यावेळी परिमंडळ एकचे उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ दोनच्या उपायुक्त मोनिका राऊत, मुख्यालयाचे उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्यासह सहायक आयुक्त, वरिष्ठ पोलिस निरीक्षकांसह शहर, परराज्यातील अंमलदार उपस्थित होते.

रविवारी (ता.१९) सकाळी सात वाजताच बूथनिहाय अंमलदार मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकाऱ्यांसमवेत हजर होणार आहेत. तसेच, त्याच ठिकाणी त्यांच्या मुक्कामाची व्यवस्था केलेली आहे. आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली नेमलेल्या सेक्टरनिहाय पोलिस अधिकाऱ्यांची मतदान केंद्रांवर करडी नजर राहणार आहे. (latest marathi news)

Deputy Commissioner of Police Prashant Bachhav giving instructions to the police officers who came to the polling station
Nashik Lok Sabha Constituency : भगूरमध्ये प्रचाररॅली काढत वाजेंकडून प्रचाराची सांगता

भरारी पथकासमवेतही पोलिस

आयुक्तालय हद्दीतील मतदान केंद्रांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे भरारी पथक नेमलेले आहे. या भरारी पथकात एक पोलिस अधिकारी व दोन अंमलदारांचाही समावेश आहे. याशिवाय, आयुक्तांच्या आदेशान्वये सेक्टर अधिकाऱ्याचेही पथक असून, ते आपापल्या सेक्टरमधील मतदान केंद्रांवर बारकाईने लक्ष ठेवून असतील.

अशा आहेत सूचना

- मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात मोबाईल, अन्य वस्तू, छापील कागद नेण्यास बंदी

- मतदान केंद्रावर महिला, पुरुषांची स्वतंत्र रांग लावावी

- मतदान केंद्रावर गर्दी झाल्यास त्यावर नियंत्रण ठेवावे

- १०० मीटर परिसरात निवासस्थान असेल तर तेथील माणसांची नोंद घ्यावी.

- दोन दिवस त्यांच्याकडे कोणीही बाहेरील व्यक्ती येणार नाही, तशी नोटीस बजावली

- गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यास तत्काळ सेक्टर पोलिस अधिकारी, स्थानिक पोलिस निरीक्षकांना संपर्क साधावा

- मतदान केंद्र सोडून अंमलदारांनी कुठेही जाऊ नये.

Deputy Commissioner of Police Prashant Bachhav giving instructions to the police officers who came to the polling station
Nashik Lok Sabha Constituency : बावनकुळे, महाजनांचा ठाकरेंवर हल्लाबोल! राजकीय चिखलफेकीने गाठले टोक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com