Nashik Lok Sabha Election : विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळ कुटुंबात फूट ! झिरवाळ यांनी दिंडोरीत मागितली राष्ट्रवादीची ‘तुतारी’

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Electionesakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीत अनेक राजकीय कुटुंबामध्ये कलह निर्माण झालेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर आहे. झिरवाळ यांचे चिरंजीव गोकुळ झिरवाळ यांनी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) तुतारी चिन्हावर लढण्याची तयारी दर्शविली आहे. (nashik lok sabha election zirwal asked for NCP trumpet in Dindori marathi news)

यााबाबतचे पत्रच त्यांच्या समर्थकांनी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांना दिले आहे. त्यामुळे दिंडोरी मतदारसंघात नवा ट्विस्ट आला आहे. दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळविण्यासाठी आता मोठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महिनाभरापूर्वी उमेदवारीसाठी अनेकांना विचारणा करूनही अनेकांनी थेट नकार दर्शविला होता.

मात्र, गत काही दिवसात चित्र पालटले असून अनेक राजकीय इच्छुकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेटी घेतल्या आहेत. यात माकपाकडून उमेदवारीसाठी आग्रही असलेले माजी आमदार जे. पी. गावित यांनी पवार यांची भेट घेत उमेदवारीची मागणी केली. त्यासाठी त्यांनी थेट तुतारी चिन्हावर निवडणुक लढविण्याची इच्छा दर्शविली.

मतदारसंघातील महाविकास आघाडीतील विविध पक्षातील नेत्यांनी भाजपचे अनुसूचित मोर्चाचे अध्यक्ष एन. डी. गावित यांनाही उमेदवारी देण्याचा आग्रह पवार यांच्याकडे धरला आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी थेट राज्यातील ग्रामसेवक संघटनांनी पवार यांना साकडे घातल्याचे बोलले जात आहे. यातच, एन. डी. गावित यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्याचे वृत्त आहे. (latest marathi news)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : महाविकास आघाडीतर्फे राजाभाऊ वाजेच; नाशिकमध्ये महायुतीच्या उमेदवाराला टक्कर

माजी आमदार रामदास चारोस्कर, सुनिता चारोस्कर यांच्या उमेदवारीसाठी दिंडोरीतून त्यांच्या सर्मथकांनी आग्रह धरला आहे. या घडामोडीत आता गोकुळ झिरवाळ यांचीदेखील भर पडली आहे. गोकुळ झिरवाळ यांच्या समर्थकांच्या शिष्टमंडळाने जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड यांची गुरूवारी (ता.२८) रात्री उशीराने भेट घेतली.

यावेळी शिष्टमंडळाने गोकुळ झिरवाळ यांना उमेदवारी देण्याची मागणी केली. तसेच गोकुळ झिरवाळ हे राष्ट्रवादीच्या तुतारी चिन्हावर निवडणुक लढण्यास तयार असून मला उमेदवारी द्यावी या आशयाचे पत्रदेखील त्यांनी यावेळी दिले. त्यामुळे दिंडोरीत शरद पवार नेमके कोणास उमेदवारी देत राजकीय गणित फिरवितात याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

झिरवाळांच्या सिग्नलकडे लक्ष

दरम्यान, जिल्हाध्यक्ष आव्हाड यांना उमेदवारी मागणीचे पत्र मिळाले असले तरी, केवळ मागणीवर विसंबून न राहता थेट विधानसभेचे उपाध्यक्ष झिरवाळ यांनी उमेदवारीची मागणी करावी तरच, उमेदवारीचा विचार करण्याची भूमिका पक्षाने घेतली असल्याचे समजते. त्यामुळे झिरवाळ आता चिरंजीवाला ग्रीन सिग्नल देतात की नाही याकडे लक्ष लागले आहे.

''गोकुळ झिरवाळ यांच्या समर्थकांनी भेट घेत उमेदवारीची मागणी केली आहे. तुतारी चिन्हावर लढण्यास तयार असल्याचे पत्र देखील मिळाले आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कळविले आहे. याबाबत लवकरच अंतिम निर्णय होईल.''- कोंडाजी आव्हाड (जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : दिंडोरीत महाविकास आघाडीकडून उमेदवारीसाठी रस्सीखेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com