Nashik Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवरून महायुतीचा सस्पेन्स कायम; जागेसाठी भाजप आग्रही

Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेवर महायुतीचा सस्पेन्स आजही कायम राहिला.
 Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Nashik Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी नाशिकच्या जागेवर महायुतीचा सस्पेन्स आजही कायम राहिला. महायुतीकडून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून आठ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात नाशिकची जागा वेटींगवर ठेवण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडूनही छगन भुजबळ यांचे नाव घोषित न झाल्याने महायुतीत नाशिकच्या जागेवरून राजकीय पातळीवर मोठी खलबते सुरु आहेत. (Nashik Lok Sabha Elections Suspense of Grand Alliance over Nashik seat continues marathi news)

दरम्यान, नाशिक धार्मिक स्थळ असल्याने व देशभरात धार्मिक स्थळांच्या मतदारसंघात भाजपचे उमेदवार असल्याने नाशिक मधूनही भाजपला उमेदवार देण्याचा आग्रह वाढला आहे. त्यामुळे वादाच्या पार्श्‍वभूमीवर ऐनवेळी नाशिकची जागा भाजपकडे जाण्याची शक्यता बळावली आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीकडून सिन्नरचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांची उमेदवारी निश्चित करण्यात झाली.

मात्र दुसरीकडे महायुतीत अद्यापही जागेचा तिढा सुटलेला नाही. १२ मार्चला शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना तयारीला लागा, तिसऱ्या विजयाचा गुलाल उधळा, विजय आपलाच असल्याचे सांगितल्यानंतर शिंदे गट जोरदार तयारीला लागला. मात्र त्याचे पडसाद दुसऱ्याच दिवशी उमटले. भाजपच्या वतीने ‘नाशिकची जागा कमळाची’च असा आग्रह धरत पक्ष कार्यालयात आंदोलन देखील करण्यात आले.

त्यानंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी थेट मुंबई गाठत वरिष्ठांकडे नाशिकच्या जागेसाठी आग्रह धरला. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांच्यात दिल्लीत बैठक झाल्यानंतर नाशिकच्या लोकसभेच्या जागेवर तिसरा भिडू तयार झाला. मनसेकडूनही नाशिकच्या जागेची मागणी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्ह्यात पाच आमदार असल्याने नाशिकची जागा राष्ट्रवादीलाच हवी अशी मागणी छगन भुजबळ यांच्याकडून वारंवार केली जात होती. (latest marathi news)

 Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीकडून नाशिकमधून राजाभाऊ वाजे?

उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली असताना शिंदे गटाला मोठा धक्का बसला. नाशिकची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडली जाणार व त्यातही छगन भुजबळ हे महायुतीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढविणार अशी शक्यता बळावल्याने शिंदे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्याच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले. त्यात पालकमंत्री दादा भुसे हे देखील सहभागी झाले होते.

त्यानंतर पुन्हा बुधवारी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकच्या जागेसाठी मुख्यमंत्री शिंदे यांना त्यांच्या वर्षा निवासस्थानी साकडे घातले. मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा नाशिकलाच जागा मिळेल असा शब्द दिल्यानंतर गुरुवारी दिवसभर शिंदे सेनेचे पदाधिकारी जोशात होते. मात्र मुख्यमंत्री शिंदे यांनी आठ जागांची यादी जाहीर केली, त्यात नाशिकचा कोठेही उल्लेख नसल्याने शिंदे सैनिकांचा व पदाधिकाऱ्यांचा हिरमोड झाला.

राष्ट्रवादीकडूनही नाव गुलदस्त्यात

पुणे येथील बैठकीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज राज्यातील पाच जागांची यादी जाहीर केली जाणार होती. त्यात नाशिकच्या जागेचा देखील समावेश असल्याचे बोलले जात होते. नाशिकमधून अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचे नाव आज जाहीर होईल. असे बोलले जात होते मात्र नाशिकच्या जागेसाठी शिंदे सेनेच्या वाढत्या आग्रहामुळे राष्ट्रवादीकडून नावे जाहीर झाले नसल्याचे बोलले जात आहे.

आज उमेदवारी जाहीर होणार

नाशिकच्या जागेवर भाजपसह शिंदे सेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसेचा देखील दावा असल्याने नाशिकच्या जागेवरून तेढ निर्माण झाली आहे. दरम्यान शुक्रवारी (ता. २९) जागेसंदर्भातील तिढा सुटणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.

 Lok Sabha Election
Nashik Lok Sabha Election : राजाभाऊ वाजेंचे शक्तिप्रदर्शन; शिवसेना भवनात सत्कार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com