
सिन्नर : राज्य परिवहन महामंडळाच्या सिन्नर येथील बस स्थानकात बाटलीबंद पाण्यापाठोपाठ शीतपेय व बिस्किटांची देखील दुप्पट दराने विक्री दणक्यात सुरू आहे. शीतपेयाच्या बाटल्या व बिस्किटांच्या वेस्टनावरील किमती मार्कर पेनच्या सहाय्याने खोडून टाकल्या जात असून एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून या प्रकाराकडे मात्र डोळेझाक होत आहे. परिवहन महामंडळाचे सिन्नर येथील बस स्थानक नाशिक-पुणे व मुंबई - शिर्डी महामार्गावरील महत्त्वाचा थांबा आहे.