
Nashik : शासन आणि नागरिक यांच्यातील महत्त्वाचा दुवा असलेल्या जिल्हा प्रशासनाची यंत्रणा २०२४ मध्ये वर्षभर निवडणूका आणि इतर कामांनी व्यस्त राहिली. गावठाण जमिनी संदर्भातील निर्णय काहींसाठी दिलासादायक राहिला. तर पालकमंत्र्यांच्या नियुक्तीअभावी पाणी आरक्षणाचा मुहूर्त लागू शकला नाही. लोकसभा निवडणुका, शिक्षक मतदार संघाची विधान परिषद निवडणूक आणि नंतर विधानसभा निवडणूक अशा तीन निवडणुका प्रशासनाने पार पाडल्या.