Nashik Maha Sanskruti Mahotsav : शहरात 5 दिवस रंगणार महासंस्कृती महोत्सव; 2 कोटी मंजूर

Maha Sanskruti Mahotsav : शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजन केले जाणार आहे.
Funding
Fundingesakal

Nashik Maha Sanskruti Mahotsav : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध प्रदेशांतील संस्कृतीचे आदानप्रदान करणे व स्वातंत्र्य लढ्यातील लढवय्यांची माहिती जनसामान्यांपर्यंत पोचविण्याच्या उद्देशाने पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सव (Maha Sanskruti Mahotsav) आयोजित करण्यात येणार आहे. शिवराज्याभिषेकाच्या ३५०व्या वर्षानिमित्त महानाट्याचे आयोजन केले जाणार आहे. या दोन्ही कार्यक्रमांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर केला आहे. (Nashik Maha Sanskruti Mahotsav marathi news)

येत्या पंधरा दिवसांच्या आत महासंस्कृती महोत्सव नाशिकमध्ये होणार आहे. त्याचा परिपूर्ण आराखडा तयार करून नियोजन करण्याचे काम जिल्हा महसूल प्रशासनाकडून केले आहे. त्यामुळे निवडणुकांची आचारसंहिता लागण्यापूर्वी नाशिककरांना सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी मिळणार आहे.

शिवराज्याभिषेकला ३५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्त राज्य सरकारने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. त्यानुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यांत सलग तीन दिवस शिवरायांवरील महानाट्याचे आयोजन केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या ३९ कोटी रुपयांच्या निधी राज्य सरकारने मंजूर केला आहे.

या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली १५ जणांची समिती स्थापन करण्यात आली असून हा कार्यक्रम शासन स्तरावरूनच प्रत्येक जिल्ह्यात राबवण्यात येणार आहे.

Funding
Thackeray Group News : सुनील बागूल निष्ठावंत शिवसैनिक : आदित्य ठाकरे

शिवरायांच्या जीवनावर आधारित महानाट्य सादर केले जाणार असून, त्यात महाराजांच्या कार्याची, नीतीची, चरित्राची, विचारांची आणि कार्यकुशलतेची महती जनसामान्यांना, तरुण पिढीला करून देण्यासाठी त्यांच्या जीवनावर आधारित महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्यात सलग तीन दिवस तीन प्रयोगांचे सादरीकरण होणार आहे. संबंधित जिल्ह्यातील नामवंत मंडळींना महानाट्य कार्यक्रमाला आमंत्रित केले जाणार आहे.

"स्थानिक कलावंतांना विश्वासात घेऊन या महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे. श्री शिवचरित्रावर आधारित सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच भारूड, गोंधळ, पोवाडा, खडी गंमत, कोळीगीत, लोककलेतील विविध प्रकार, नाटक, कवी संमेलन, व्याख्यानमाला आदी कार्यक्रमांचा यात समावेश आहे." -राजेंद्र वाघ, निवासी उपजिल्हाधिकारी

Funding
Nashik News : कोरोनायोद्धे 50 लाखांच्या मदतीपासून वंचित! शासन, महापालिकेत टोलवाटोलवी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com