
Nashik News : मनुष्याच्या जीवनात अशक्य असे काहीच नाही. मात्र काही गोष्टी विज्ञानाच्या पलीकडच्या आहेत. दैवी शक्तीचे अस्तित्व मान्यच करावे लागेल. ईश्वरी शक्ती सोबत असल्यास मनुष्याला कशाचीच भीती नाही. ईश्वरी शक्तीसमोर विज्ञान देखील फिके असल्याचे प्रतिपादन सराला बेटाचे महंत रामगिरी महाराज यांनी केले. पंचाळे (ता. सिन्नर) येथे १७७ वा सद्गुरू गंगागिरी महाराज फिरता नारळी सप्ताह सुरू आहे. (Mahant Ramgiri Maharaj participated in Maha Kumbh of Varkaraya with five lakh devotees)