
Assistant Police Inspectors Transfers : महाराष्ट्र पोलीस दलातील राज्यातील ३०० सहायक पोलीस निरीक्षकांच्या तर, १२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या विनंतीनुसार बदल्या करण्यात आल्या आहेत. यात राज्यभरातील अनेक ठिकाणांवरून २७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात दाखल होत आहेत. तर, पाच अधिकाऱ्यांची बदली झाली आहे. (Transfers of 420 Assistant Police Inspectors in state)
लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच, राज्यातील पोलीस दलातील प्रलंबित बदल्यांचे आदेश जारी होत आहेत. आस्थापना विभागाचे अपर पोलीस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांनी राज्यातील ४२० सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्याचे आदेश जारी केले आहेत.
जितेंद्र वाघ, तुषार देवरे, सरला पाटील, हिरामण भोये, क्षितीजा दुबे, राजेश काळे हे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयात रूजू होतील. तर, राजेंद्र सानप नाशिक ग्रामीणमधून लाचलुचपत प्रतिबंधक विभागात, प्रदीप आव्हाड नाशिक ग्रामीणमधून नवी मुंबईत, मनोज पवार व आशिष रोही हे नाशिक ग्रामीणमधून अमरावती परिक्षेत्रात तर, सोमनाथ गेंगजे हे नाशिक शहरातून नाशिक ग्रामीणमध्ये रूजू होतील. (latest marathi news)
२७ सहायक निरीक्षक नाशिक परिक्षेत्रात
संदीप वाघ, जितेंद्र पाटील, सुरेश बर्गे, संजयकुमार सोने, नंदकिशोर काळे, राजाराम तडवी, सुरेश खाडे, अभय दंडगव्हाळ, जनार्दन खंडेराव, रमेश वावरे, जगदीश गावित, विकास शेवाळे, निलिमा डोळस, गायत्री जाधव, विकास काळे, किरण पाटील, योगेश पाटील, शत्रुघ्न पाटील, माधुरी बोरसे, कल्पना चव्हाण, विश्वास चव्हाण, प्रदीप एकशिंगे, रमीज मुलाणी, भारत जाधव, गोरख पालवे, उमेश महाले, किरण मेहेर.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.