Nashik News : नूतनीकरणानंतरही महात्मा फुले कलादालन बंदच! कलावंतांना फायदा ना महापालिकेला

Nashik : स्मार्टसिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरबरोबर कोरोनाकाळात शालिमार परिसरातील महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण करण्यात आले होते.
Mahatma Phule Gallery.
Mahatma Phule Gallery.esakal

Nashik News : स्मार्टसिटीअंतर्गत महाकवी कालिदास कलामंदिरबरोबर कोरोनाकाळात शालिमार परिसरातील महात्मा फुले कलादालनाचे नूतनीकरण करण्यात आले होते. १८०० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या कलादालनावर ३.६६ कोटी रुपये खर्च सुशोभीकरण करण्यात आले पण, आत्ताच्या घडीला महात्मा फुले कलादालन बंद अवस्थेत असून एसी आणि लाईट्स काम अपूर्ण असल्याने परिसरात गवत वाढलेले आहे. कलादालनाची पार रया गेली असून पालापाचोळा साचलेला आहे. (Nashik Mahatma Phule Kaladalan remains closed even after renovation marathi News )

जानेवारीत झालेल्या युवा महोत्सवात केवळ बाहेर राज्यातून आलेल्या युवकांना जेवणासाठी कलादालन खुले करण्यात आले होते, त्यानंतर आजतागत ते बंदच आहे. शहरातील नवोदित होतकरू कलावंतांना चित्रांचे प्रदर्शन घ्यावयाचे झाल्यास खासगी कलादालनाचे शुल्क परवडणारे नाही. पैकी कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे छंदोमयी सभागृहाचे एक दिवसाचे शुल्क तीन हजार रुपये तर, नाशिक रोड येथील पु. ना. गाडगीळ सराफ कलावंतांना प्रदर्शनासाठी मोफत दालन उपलब्ध करून देतात.

याउलट महापालिकेच्या महात्मा फुले कलादालनाचा एक दिवसाचे शुल्क तीस-चाळीस हजार रुपये आकारले जात असल्याचे अनुभवी कलावंत सांगतात. परिणामी स्मार्टसिटी अंतर्गत सुशोभीकरण केल्यानंतर कलादालन बंदच असल्याने त्याचा कलावंतांना फायदा ना महापालिकेला. बंद असलेले कलादालन कलावंतांना नाममात्र शुल्कात उपलब्ध करून दिल्यास त्या परिसराची देखभाल होईल, नागरिकांची वर्दळ वाढेल.

शिवाय कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होऊन, बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना नाशिकची ओळख असलेल्या चित्रांची माहिती मिळेल. दरम्यान, मुंबईच्या १९५२ साली स्थापन झालेल्या जहाँगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन घ्यावे हे प्रत्येक कलावंताचे स्वप्न असते. या गॅलरीत सात दालने असून वर्षभरात ३०० हून अधिक प्रदर्शन घेतली जातात. उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी दालनानुसार नाममात्र ४ ते ६ हजार रुपये शुल्क आकारले जात. अशी सुविधा नाशिक शहरात उपलब्ध करून दिल्यास कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध होईल कला जिवंत राहील.(latest marathi news)

Mahatma Phule Gallery.
Nashik News : शाळेला टप्पा देत मुलींनी केला ‘एन्जॉय’ अन पालक-पोलिसांचे मात्र दणाणले धाबे!

''डिसेंबर २०१८ मध्ये महात्मा फुले कलादालनात गोदा स्पंदन प्रदर्शन घेतले होते. तीन दिवसाचा ९९ हजार रुपये खर्च आला. चित्रकला व्यवसाय नाही की, प्रदर्शनातून उत्पन्न मिळेल आणि कलादालनासाठी भरलेले शुल्क वसूल होईल. शासनाने हेल्पिंग हॅण्ड म्हणून छोटी जागा उपलब्ध करून द्यावी जेणेकरून कलावंताला कला सादर करता येईल.''- श्रीकांत नागरे, चित्रकार

''महात्मा फुले कलादालनाचे काम अपूर्ण असल्याने सध्या बंद आहे. या संदर्भात स्मार्टसिटीला दोन-तीन पत्र दिले आहेत. तिथे मध्यंतरी एसी चोरीला गेले होते शिवाय एसी, लाईटची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत.''- मोहन गिते, व्यवस्थापक

शहरात असणारी कलादालने

-रिच आउट आर्ट गॅलरी, शरणपूर रोड

-गुरुदक्षिणा सभागृह, कॉलेज रोड

-इंडेक्स आर्ट गॅलरी, तिडके कॉलनी

-छंदोमयी सभागृह, कुसुमाग्रज स्मारक

-महात्मा फुले कलादालन, शालिमार

-सर्वात्मक गॅलरी, इंदिरानगर

Mahatma Phule Gallery.
Nashik News : रोजगार हमीच्या कामात नाशिकची आघाडी; जिल्ह्यात 127 कोटी रुपयांची कामे पूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com