Nashik News : गुन्हेगारी, अवैध शस्त्रांना आळा घालण्याचे आव्हान! मालेगाव शहरातील घटनांनी शांततेचा भंग

Nashik : आचारसंहिता व निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक शस्त्र जमा करण्यात आली आहेत. मात्र, बहुसंख्य गुन्हेगार, समाजकंटक, रोडरोमिओ व गल्ली दादांकडे अवैधरित्या गावठी पिस्तुल व शस्त्रास्त्र आहेत.
Police
Police esakal

मालेगाव : शहरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे. आचारसंहिता व निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर परवानाधारक शस्त्र जमा करण्यात आली आहेत. मात्र, बहुसंख्य गुन्हेगार, समाजकंटक, रोडरोमिओ व गल्ली दादांकडे अवैधरित्या गावठी पिस्तुल व शस्त्रास्त्र आहेत. शहरात शस्त्राचा धाक दाखवून लुटीच्या घटना घडत आहेत. (Malegaon crime illegal weapon challenge to prevent)

अशातच या आठवड्यात एक दिवसाआड गोळीबाराच्या तीन घटनांनी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. खेळण्यातील पिस्तुलाप्रमाणे गुन्हेगार गावठी पिस्तुलाचा वापर करीत आहेत. मच्छी बाजार कमालपुरा भागातील घटनेत थेट ९ एमएम पिस्तुलचा वापर झाला. पोलिस प्रशासनाने कोम्बींग ऑपरेशन वा नाकाबंदी करुन अवैध शस्त्रास्त्र हुडकून काढतांनाच गुन्हेगारी व अवैध धंद्यांना आळा घालणे गरजेचे आहे.

अन्यथा, शांततेची कूस धरलेल्या शहरात अनर्थ अथवा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पूर्व भागापाठोपाठ शांत असलेल्या संगमेश्‍वर भागातही गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. तीन दिवसांपूर्वी येथे गोळीबाराचा प्रकार घडला होता. नवतरुण व्यसन व गुन्हेगारीच्या विळख्यात जखडले जात आहेत. नशेच्या गर्तेत हे तरुण वाटेल ते कृत्य करण्यास धजावत आहेत.

नुकतेच मिसरुड फुटलेल्या तरुणांचा गुन्हेगारीतील सहभाग चिंतेची बाब असून, पालकांनीही त्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मच्छी बाजार भागातील गोळीबार अवैध धंदे करणाऱ्या व्यावसायिकांच्या वादातूनच घडला. या प्रकारात मसुद व फिरोज गांजावाला या दोन प्रमुख गांजा विक्रेत्यांमधील वादाचे पर्यावसन गोळीबारात झाले. दोघे अवैध व्यावसायिक बाजुला राहून त्यात सामान्य ट्रकचालक भरडला गेला. गोळीबारात तो गंभीर जखमी झाला असून, त्याची प्रकृती अत्यवस्थ आहे. (latest marathi news)

Police
Nashik ZP News : नाशिक जिल्हा परिषद निधी खर्चात अव्वल!

संगमेश्‍वर भागातील गुन्हेगारी व नशेखोरीत तर हिंदू-मुस्लिम नवतरुण हातात हात घालून वाटचाल करीत आहेत. या तरुणांसंदर्भात पोलिस प्रशासनाकडे वारंवार तक्रारीदेखील झाल्या. नंतरच्या काळात गुन्हेगारीच्या विळख्यात असलेल्या तरुणांच्या धाकापोटी तक्रार करण्यासही कोणी पुढे येत नाही. यातून गुन्हेगारी करणाऱ्या तरुणांचे फावते.

शहरातील सर्व प्रमुख चौक व गल्ली बोळांमध्ये गल्लीदादा निर्माण झाले आहेत. तरुणींची छेडछाड नेहमीचीच झाली आहे. गुन्हेगारांच्या नादी लागून काय नुकसान करुन घ्यावयाचे असे म्हणत तरुणी व त्यांचे पालकही या प्रकारांकडे दुर्लक्ष करीत आहेत. शहरातील कॅम्प, संगमेश्‍वर, कलेक्टरपट्टा व टिळकनगर भागातही असे प्रकार घडले आहेत. पोलिसांनी गस्त घालून रात्री, अपरात्री चौकात टोळके करुन बसणाऱ्या या तरुणांचा बंदोबस्त करतांना त्यांना धाक दाखविणे गरजेचे आहे.

गावठी पिस्तुलसह हाणामारीच्या प्रकारात कोयता, तलवारी, लोखंडी रॉड, फायटर यांचा सर्रास वापर होत आहे. दशकापुर्वी शहरात गुन्हेगारीने डोके वर काढल्यानंतर पोलिस प्रशासनाने पूर्व-पश्‍चिम भागात प्रमुख रस्त्यांवर ठिकठिकाणी नाकेबंदी करुन तरुणांची तपासणी केली असता अनेक वेळा वस्तारे व शस्त्रास्त्र मिळून आली आहेत.

Police
Nashik NMC News : ‘पीटीसी’समोरील वादग्रस्त जागेवर मनपाचाच दावा; सर्वोच्च न्यायालयात अहवाल सादर

मध्यंतरी गुन्हेगारांचा वावर असलेल्या भागात कोम्बींग ऑपरेशनही राबविण्यात आले होते. त्याचाही चांगला परिणाम झाला होता. पोलिस प्रशासनाने किरकोळ प्रकार म्हणून या घटनांकडे दुर्लक्ष करणे घातक ठरणार आहे.

तक्रारीनंतरही कारवाई शून्य

संगमेश्‍वर भागात समाजकंटकांनी सीसीटीव्ही चोरुन नेणे, मध्यंतरी शौचालय व सुशोभिकरणाचीही तोडफोड करण्यात आली. महापालिका प्रशासनाने यासंदर्भात तक्रारी केल्यानंतरही कारवाई झाली नाही. संगमेश्‍वर भागातील वाल्मिकनगर शौचालयातील नासधूस व दरवाजे तोडण्याचे प्रकारही वारंवार घडत आहेत. या प्रकारांना आळा घालणे आवश्‍यक आहे.

Police
Nashik News : देव तारी त्याला कोण मारी! तिसऱ्या मजल्यावरून पडलेला चिमुरडा सुदैवाने बचावला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com