

Ashok Kharat Case Exposes Fake Godmen Racket in North Maharashtra
esakal
Ashok Kharat Case: उत्तर महाराष्ट्रातील नाशिक शहर ते मालेगाव तालुक्यापर्यंत भोंदूबाबांचा अड्डा निर्माण झाला आहे. जादूटोणा, तंत्र-मंत्र, जमिनीतून सोने काढणे, भविष्य सांगणे अशा खोट्या आश्वासनांच्या आडोशाने हे भोंदूबाबा महिलांचे लैंगिक शोषण करतात, कुटुंबीयांची आर्थिक फसवणूक करतात आणि अनेकांचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात. संपत्ती संपवून, मानसिक आरोग्य बिघडवून, कुटुंबे मोडून काढूनही हे प्रकार थांबत नाहीत. सरकार आणि प्रशासन मात्र जागे होत नाही. अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याची अंमलबजावणी कमकुवत, पोलीस तपासात राजकीय हस्तक्षेपाची भीती आणि भोंदूबाबांच्या राजकीय-सामाजिक संबंधांमुळे ही मालिका सुरूच आहे. याचे ज्वलंत उदाहरण आहे नाशिकचे स्वयंघोषित ज्योतिषी आणि भोंदूबाबा अशोक खरात उर्फ ‘कॅप्टन’. अशे अनेक अशोक खरात आजही नाशिक-मालेगाव परिसरात सक्रिय आहेत.