नाशिक: जिल्ह्यातील तीव्र कुपोषित ४१२ बालकांचे पालकत्व सनदी अधिकाऱ्यांना देण्याची अभिनव संकल्पना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी आणली आहे. अधिकाऱ्यांनी दत्तक घेतलेल्या बालकांचे संगोपन त्याचे आई-वडीलच करतील, पण त्यासाठी मार्गदर्शन हे अधिकारी करणार असल्याने जिल्हा कुपोषणमुक्त होण्यास निश्चितपणे मदत होईल, असा आशावाद पवार यांनी व्यक्त केला.