
नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी स्वच्छता हा कामाचा प्राधान्यक्रम राहील, त्या पाठोपाठ प्रशासकीय कामकाजात गतिमानता, टेबलची संख्या कमी करून कामांचे केंद्रीकरण व नागरिकांना अधिक जलद गतीने सेवा सुविधा मिळवून देणे अशी कामाची दिशा असेल, अशी माहिती महापालिकेच्या नवनियुक्त आयुक्त मनीषा खत्री यांनी दिली. खत्री यांनी शुक्रवारी (ता.२७) महापालिका मुख्यालयात आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला.