Nashik Accident News : वऱ्हाडाच्या भरधाव ट्रकने चिरडल्या 40 मेंढ्या; जोंधळवाडी पेट्रोलपंपा जवळील दुर्घटना

Nashik News : नांदगाव येथून वऱ्हाड घेऊन भरधाव जाणाऱ्या एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या सुमारे ३५ ते ४० मेंढ्या चिरडल्याची घटना मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडली.
Nashik Accident News
Nashik Accident Newsesakal
Updated on

Nashik News : मनमाड- नांदगाव मार्गावरील जोंधळवाडी पेट्रोलपंपाशेजारी नांदगाव येथून वऱ्हाड घेऊन भरधाव जाणाऱ्या एका आयशर ट्रकने रस्त्याच्या कडेने जाणाऱ्या सुमारे ३५ ते ४० मेंढ्या चिरडल्याची घटना मंगळवारी (ता. ९) रात्री आठच्या सुमारास घडली. अपघातानंतर न थांबता फरारी झालेल्या आयशर चालकास पोलिसांनी मालेगाव चौफुली येथे शिताफीने ताब्यात घेतले. (40 sheep crushed by speeding truck)

जीवापाड जपलेल्या मेंढ्या अचानक चिरडल्या गेल्याने मेंढपाळाच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, त्यास शासनाने तत्काळ मदत करावी, अशी मागणी होत आहे. नांदगाव तालुक्यातील खिर्डी येथील शांताराम त्र्यंबक खरात यांच्या मालकीच्या मेंढ्या मंगळवारी रात्री आठच्या सुमारास मनमाड- नांदगाव महामार्गाच्या कडेने जात होत्या.

त्याच सुमारास नांदगाव तालुक्यातील चंदनपुरी येथून ओझरकडे लग्नासाठी वऱ्हाड घेऊन आयशर ट्रक (एमएच १४ ईएम ५७६८) भरधाव वेगात निघाला होता. जोंधळवाडी पेट्रोलपंपाशेजारी काही कळण्याच्या आत भरधाव आयशर ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या मेंढ्यांना चिरडले. हा अपघात इतका भयंकर होता, की यात ३५ ते ४० मेंढ्या जागीच चिरडल्या गेल्या. (latest marathi news)

Nashik Accident News
Nagpur Accident : मंगळवार ठरला घातवार, ५ अपघातात ६ ठार

रस्त्यावर मृत्युमुखी पडलेल्या मेंढ्या आणि रक्ताचा सडा पडलेला होता. घटनेची माहिती मिळताच हिसवळ ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. यासंदर्भात ग्रामस्थ दत्तू पवार यांनी पोलिसांना आयशर ट्रक मनमाडकडे भरधाव आल्याची माहिती दिली. मालेगाव चौफुली येथे नागरिकांनी आणि पोलिसांनी ट्रक पकडला असून, चालकास ताब्यात घेतले आहे.

३५ ते ४० मेंढ्या चिरडल्या गेल्याने मेंढपाळाकडे उपजीविकेचे साधन राहिले नसल्याने शासनाने सदर मेंढपाळास तातडीने मदत करण्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, या अपघातात पाच लाखांच्या आसपास नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Nashik Accident News
Ram Jhula Accident : रितूला तहसील पोलिसांच्या तांत्रिक चुकीचा पुन्हा फायदा; जेएमएफसी न्यायालयाने अर्ज फेटाळला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.