
Nashik Manoj Jarange Patil : शहराच्या मुख्य बाजारपेठेतून रॅली आणि महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांसमोर मनोज जरांगे पाटील यांच्या सभेला पोलिसांनी परवानगी दिल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तणावाचे वातावरण होते. सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांनी प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुटी जाहीर केली. पण गर्दीमुळे सभास्थळी तणाव निर्माण होण्याची शक्यता असतानाही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळण्यात पोलिसांना यश आल्याने प्रशासनाने अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला. (Manoj Jarange Patil sigh of relief from administration after Jarange meeting)