
नाशिक : बायका आपल्या अडचणी मैत्रीण, आई, बहिण अगदी कुणासोबतही बोलून सहज मोकळ्या होतात पण पुरुषांचे मात्र तसे नसते. आपल्या भावना कोण समजून घेईल, निदान ऐकून तरी घेईल, असा व्यक्ती त्यांना अपेक्षित असतो. मित्राबरोबर बोलायचं झाल्यास त्याच्या आयुष्यात आधीच अडचणी त्यात आपले रडगाणे कोण ऐकणार, म्हणून या पुरुषांचं जगताना व्यक्त व्हायचं राहूनच जातं आणि वाट्याला येते ती घुसमट. मनात साचलेल्या गोष्टी वेळीच व्यक्त न केल्याने त्यातून मानसिक आजार वाढून विकोपाला जातात.