Nashik News : नाशिकमधल्या मराठी भाषा अभ्यासकेंद्राच्या कामाला वेग; सत्यजीत तांबेनी घेतला आढावा

मराठी साहित्यातील मेरूमणी आणि आधुनिक युगाचे कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या नावे नाशिक येथे उभ्या असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आता मराठी भाषा अभ्यास केंद्राची जोड मिळणार आहे.
Satyajeet Tambe
Satyajeet Tambesakal
Summary

मराठी साहित्यातील मेरूमणी आणि आधुनिक युगाचे कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या नावे नाशिक येथे उभ्या असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आता मराठी भाषा अभ्यास केंद्राची जोड मिळणार आहे.

मराठी साहित्यातील मेरूमणी आणि आधुनिक युगाचे कवी वि. वा. शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांच्या नावे नाशिक येथे उभ्या असलेल्या कुसुमाग्रज प्रतिष्ठानला आता मराठी भाषा अभ्यास केंद्राची जोड मिळणार आहे. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या प्रयत्नांनी ५० लाख रुपयांचा निधी मिळाला असून हे केंद्र संपूर्णपणे संगणकीय प्रणालीने जोडलं असेल. या कामाची पाहणी आमदार तांबे यांनी केली. विशेष म्हणजे मुंबईत उभारण्यात येणारं मराठी भाषा भवन आणि नाशिकमधील हे केंद्र यांच्यात एकत्रित समन्वय कसा साधला जाऊ शकतो, याबाबतही आमदार तांबे यांनी पुढाकार घेत मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली.

मराठी साहित्य आणि सांस्कृतिक विश्वात नाशिकचं स्थान खूप मोठं आहे. ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवले गेलेले कुसुमाग्रज नाशिकचेच! त्याशिवाय ज्येष्ठ नाटककार वसंत कानेटकर हेदेखील नाशिकचेच. या दोघांनी नाशिकचं नाव साहित्याच्या क्षेत्रात अग्रणी ठेवलं. तसंच मराठी साहित्यात मोलाची भर घालणारे विनायक दामोदर अर्थात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्म देखील नाशिकचाच आहे. नाशिकचं सार्वजनिक वाचनालय असो किंवा परशुराम साईखेडकर आणि कालिदास नाट्यगृह असो, नाशिकसह राज्याच्याही सांस्कृतिक जडणघडणीत या संस्थांनी मोलाची भूमिका बजावली आहे.

नाशिकचं हेच सांस्कृतिक वैशिष्ट्य अधोरेखित करत आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या कार्यकाळाच्या पहिल्याच महिन्यात कुसुमाग्रज प्रतिष्ठानअंतर्गत मराठी भाषा अभ्यास केंद्र स्थापन करण्यासाठी मंजुरी मिळवली. विशेष म्हणजे राज्य शासनाने ५० लाख रुपयांचा निधीही देऊ केला. या कामाची पाहणी आमदार सत्यजीत तांबे यांनी केली. यावेळी, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे विलास मुरणारी, अजय निकम, गुरमीत बग्गा, ऍड. काळोगे व राहुल दिवे यांसह कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. हे अद्ययावत भाषा अभ्यास केंद्र लवकरच नाशिककरांच्या सेवेत येईल, असा विश्वास आमदार तांबे यांनी व्यक्त केला.

आमदार सत्यजीत तांबे यांची ही तळमळ पाहून मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी त्यांना मुंबई येथे राज्य सरकारकडून उभारल्या जाणाऱ्या मराठी भाषा भवनाच्या कामाचीही माहिती दिली. या मराठी भाषा भवनामुळे मराठी भाषेचं संवर्धन, जतन आणि वृद्धी याला हातभार लागेल. मराठीतील नव्या साहित्यिकांना प्रोत्साहन, मराठी भाषा इतर भाषिकांना सुलभ पद्धतीने शिकवण्याच्या नव्या पद्धती आदींबाबत या भाषा भवनात विचार आणि कार्य होईल. या कामाबाबत माहिती मिळताच आमदार सत्यजीत तांबे यांनी मुंबईतील हे भाषा भवन आणि नाशिकमधील मराठी भाषा अभ्यास केंद्र व कुसुमाग्रज प्रतिष्ठान यांच्या कामांची सांगड घातला येईल, असा विश्वास मंत्री केसरकर यांना दिला.

या भेटीनंतर मुंबईतील मराठी भाषा भवनाचे स्थापत्यकार पी. के. दास हे नाशिकच्या मराठी भाषा अभ्यास केंद्राच्या ठिकाणी येणार आहेत. त्यांच्याकडून या नव्या अभ्यास केंद्राची उभारणी कशी करता येईल, याबाबत माहिती घेतली जाईल, असं आमदार तांबे यांनी स्पष्ट केलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com