Maha DBT Scholarship Aadhar Link : आधार संलग्नीकरणासाठी मार्च अखेरची मुदत! अन्‍यथा शिष्यवृत्तीपासून वंचित राहाणार

Nashik News : मुदतीत संलग्नीकरण प्रक्रिया पूर्ण न झाल्‍यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असून, त्‍याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्य, कुलसचिव यांची राहणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे.
Adhar
Adharesakal

नाशिक : महाडीबीटी पोर्टलवर शिष्यवृत्तीसाठी अर्ज केलेल्‍या विद्यार्थ्यांचे आधारकार्ड संलग्नीकरण करण्याच्‍या सूचना शिक्षण सहसंचालक कार्यालयाकडून विद्यापीठाच्‍या कुलसचिवांना करण्यात आलेल्या आहे. ही संलग्नीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ३१ मार्चपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

मुदतीत संलग्नीकरण प्रक्रिया पूर्ण न झाल्‍यास विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार असून, त्‍याची संपूर्ण जबाबदारी प्राचार्य, कुलसचिव यांची राहणार असल्‍याचेही स्‍पष्ट केले आहे. (nashik Maha DBT scholarship Aadhaar attachment marathi news)

यावेळी कुलसचिवांना पाठविलेल्‍या पत्रात म्‍हटले आहे, की महाडीबीटी पोर्टलवरील उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्‍या शिष्यवृत्ती योजनांसाठी विद्यार्थ्यांनी भरलेल्‍या ऑनलाइन अर्जांची पडताळणी महाविद्यालय आणि विभाग स्तरावरून केली जाते. व संबंधित योजना पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्‍कम आधारकार्डशी संलग्नीकरण असलेल्‍या बँक खात्‍यामध्ये वितरित केली जाते.

ही शिष्यवृत्तीची रक्‍कम आधारकार्डशी संलग्नीकरण असलेल्‍या खात्‍यात योग्‍य कालावधीमध्ये होणे आवश्‍यक आहे. त्‍याअनुषंगाने वित्त विभागाने शासनाच्‍या विविध विभागांशी पत्रव्‍यवहार करताना त्‍यांच्‍या विभागातील वैयक्‍तिक लाभांच्‍या योजनांतील लाभार्थीं यांचे आधारकार्डशी संलग्नीकरण करण्याची कार्यवाही ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याबाबत सुचविले आहे.  (latest marathi news)

Adhar
Nashik Lok Sabha Election 2024: निवडणूक आयोगाची एक खिडकी योजना! पहिल्याच दिवशी शांतिगीरी महाराजांना प्रचारासाठी हव्या 5 गाड्या

या पार्श्वभूमीवर महाविद्यालय स्तरावरून कार्यशाळा घेऊन योग्‍य कार्यवाही करण्याबाबत सर्व महाविद्यालयांना गुगल मीटद्वारे सूचना दिल्‍या आहेत. सर्व महाविद्यालय, परिसंस्‍था, विद्यापीठांनी गांभीर्याने काम पूर्ण करताना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केलेल्‍या पात्र लाभार्थ्यांसाठी ३० मार्चपूर्वी आधार कार्डासोबत संलग्नीकरण कार्यशाळा आयोजित करून, लाभार्थ्यांच्‍या आधार कार्ड संलग्‍निकरणाची प्रक्रिया पूर्ण करावी, अशा सूचना केल्‍या आहेत.

हमीपत्र द्यावे लागणार

यासंदर्भात सर्व लाभार्थ्यांच्‍या खात्‍यांचे आधारकार्डसोबत संलग्‍नीकरण केले असल्‍याचे हमीपत्र महाविद्यालयांना द्यावे लागणार आहे. याबाबत योग्‍य कार्यवाही करताना, त्‍याबाबतचा अहवाल सादर करण्याच्‍या सूचना देखील दिल्‍या आहेत. ही प्रक्रिया पूर्ण न केल्‍यामुळे पात्र विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्‍यास सर्वस्‍वी जबाबदारी संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य, विद्यापीठांच्‍या कुलसचिव यांची राहील, असेही स्‍पष्ट केले आहे.

Adhar
Nashik Lok Sabha 2024: गोडसे समर्थकांचे ठाण्यात शक्तीप्रदर्शन! नाशिकच्या जागेवर भाजपने दावा केल्यामुळे कार्यकर्ते अस्वस्थ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com