पंचवटी- नाशिक बाजार समितीचे सभापती देवीदास पिंगळे यांच्याविरोधात संचालक मंडळाने अविश्वास ठराव मंजूर होण्यापूर्वी शिवाजी चुंभळे गटात दाखल झालेले संचालक विदेशात सफर करून आले. अविश्वास ठराव मंजुरीनंतरदेखील खबरदारीचा उपाय म्हणून काही संचालक पुन्हा परदेशवारीला गेले असल्याचे समजते. बुधवारी (ता. १९) सभापती निवडीच्या दिवशीच नाशिकमध्ये थेट सभागृहात दाखल होणार असल्याचे समजते.