

नाशिक : अशोका मार्ग परिसरातून तिघांना एमडी (मॅफेड्रॉन) ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर त्यांना एमडी पुरविणाऱ्या ड्रग पेडलरलाही जेरबंद केले. मात्र या टोळीला एमडी ड्रग्जचा पुरवठा करणाऱ्या डीलरच्याही मुसक्या आवळण्यात आल्या आहे. सराईत गुन्हेगार असलेला या तडीपार गुंडाच्या चौकशीतून नाशिकमध्ये पुन्हा सुरू झालेल्या ड्रग्ज रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे.